शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य 20 जानेवारी, 2022; खर्चावर नियंत्रण ठेवा, जोडीदाराशी गैरसमज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 07:37 IST

Today's horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...  

मेष- नावलौकिक वाढविणाऱ्या घटना घडतील. तुमचे महत्त्व सर्वांच्या लक्षात येईल. काहींना प्रवास करावा लागेल. प्रवासकार्य साधक ठरतील. मुलांना चांगल्या संधी चालून येतील. भाग्योदयकारक घटना घडतील. नोकरीत प्रगती होईल. चांगल्या बातम्या कानावर पडतील.

वृषभ- ग्रहमान अनुकूल राहील. चांगल्या बातम्या कानावर पडतील. प्रवासात फायदा होईल. नवीन ओळखी होतील. नोकरीत चांगली स्थिती राहील. नवीन जबाबदारी घ्यावी लागेल. जोडीदाराशी गैरसमज होऊ शकतात. एखाद्या व्यवहारात आर्थिक लाभ होईल.

मिथुन - व्यवसायात भरभराट होईल. मोठी गुंतवणूक करताना जाणकारांचा सल्ला घ्या. जीवनसाथीची चांगली साथ राहील. भागीदारी व्यवसायात फायदा होईल. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. काहींना जवळचा प्रवास करावा लागेल. भावंडांच्या भेटीगाठी होतील.

कर्क- धनलाभाच्या दृष्टीने चांगली स्थिती राहील. वडिलोपार्जित संपत्तीच्या कामातील अडचणी दूर होतील. संदिग्धता राहणार नाही. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. आरोग्याची काळजी घ्या. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. घरात किरकोळ वाद होईल.

सिंह- मनावरील दडपण कमी होईल. प्रसन्न विचार राहील. जीवनसाथी चांगली साथ देईल. मुलांच्या मनातील विचार समजून घ्या. नोकरीत कामाचा व्याप राहील. त्यात व्यस्त राहाल. आर्थिक स्थिती सामान्य राहील. नवीन कल्पना साकार होईल.

कन्या- महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. दूरचा प्रवास करावा लागेल. प्रवासात सावधानता बाळगा. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. नोकरीत चांगली स्थिती राहील. संयमाने वागणे आवश्यक आहे. मुलांना यश मिळेल. नवी वस्तू खरेदी कराल.

तूळ- आर्थिक लाभ होईल, भेटवस्तू मिळतील. अनेकांचे सहकार्य प्राप्त होईल. व्यवसायात विक्री चांगली होईल. मात्र, सावध असावे. नोकरीत प्रगती होईल. थोडे संयमाने बोलणे आवश्यक आहे. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

वृश्चिक- घरी पाहुणे येतील. मनासारखे भोजन मिळेल. व्यवसायात यश मिळेल. धनलाभ होईल. मालमत्तेच्या कामात यश मिळेल. एखाद्या सौद्यात मनासारखा फायदा होईल. कामात सकारात्मक बदल होतील. आवडत्या छंदासाठी वेळ द्या.

धनू- भाग्याची चांगली साथ राहील. ग्रहमानाची अनुकूलता राहील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. भावंडांची भेट होईल. काहींना अचानक प्रवास करावा लागेल. मुलांना अपेक्षित यश मिळेल. त्यांचे कौतुक होईल.

मकर- खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. काही निष्कारण खर्च होईल. आरोग्याची काळजी घ्या. महत्त्वाच्या कामात अडचण येईल. जोडीदाराची काळजी घ्या. त्याच्या अडचणी समजून घ्या. प्रवास शक्यतो टाळा. नोकरीत वादविवादात पडू नका. कामावर लक्ष केंद्रित करा.

कुंभ- अडचणी कमी होतील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. आर्थिक आवक उत्तम राहील. विविध मार्गानी धनप्राप्ती होईल. प्रेम प्रकरणात यश मिळेल. गृहसौख्य चांगले राहील.

मीन- नोकरीत प्रगती होईल. अनेकांचे सहकार्य मिळेल. मात्र, वादाचा प्रसंग खुबीने टाळा. घरात नवीन वस्तू खरेदी कराल. महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. प्रवास शक्यतो टाळा. आरोग्याची काळजी घ्या. सरकारी कामे मार्गी लागतील.

-विजय देशपांडे (ज्योतिष विशारद)

टॅग्स :Astrologyफलज्योतिष