शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य ५ एप्रिल २०२२; सरकारी कामासाठी चकरा माराव्या लागतील, थोडा संयम ठेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 07:35 IST

Today's horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक चैत्र १६, १९४४. तिथी चैत्र शुक्ल पंचमी. (सायं. ६.०२ पर्यंत), श्री शालिवाहन शके १९४४. शुभकृत नाम संवत्सर, नक्षत्र : सायं.७.४० पर्यंत रोहिणी. त्यानंतर मृग: रास - वृषभ. आज : चांगला दिवस. राहू काळ: दुपारी १२.०० ते १.३०. (राहू काळात महत्त्वाची कामे टाळा.)

मेष- चांगल्या लोकांच्या सहवासात याल, प्रगतीच्या दृष्टीने हालचाली सुरू होतील. महत्त्वाचे काम करावयाचे असेल तर योग्य काळ आहे. आर्थिक आवक चांगली राहिल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. अकल्पित लाभ होतील. संधीचा फायदा घ्या. 

वृषभ - महत्त्वाच्या कामात यश मिळेल. जोडीदार तुमच्या मर्जीनुसार वागेल. नात्यात गोडवा राहिल. महिलांना खरेदीची हौस पूर्ण करता येईल. काही कामे परस्पर पूर्ण होतील. नोकरीत कामाचा ताण कमी होईल. लोक तुमच्या मदतीसाठी पुढे येतील. 

मिथून - सामाजिक कार्यात भाग घ्याल. मात्र, वादविवाद टाळणे योग्य ठरेल. काहींना कामानिमित्त प्रवास घडून येतील. नोकरीत चांगली परिस्थिती राहिल. लोकांना नाराज करू नका. कुणाला उसने पैसे देताना विचार करुन द्या. अन्यथा पैसे अडकून पडतील. 

कर्क - तुमच्या कामाची प्रशंसा होईल. मनात आनंदी विचार राहतील. लोकांच्या भेटीगाठी होतील. त्यांच्याशी बोलून मन मोकळे होईल. लोकांचे सहकार्य मिळेल. धनलाभाच्यादृष्टीने अनुकूल काळ आहे. काहींना प्रवास करावा लागेल, काही अकल्पित लाभ होतील. 

सिंह - नोकरीत नवीन जबाबदारी घ्यावी लागेल. कामांची यादी बनवून प्राधान्यक्रम ठरवून कामे करणे गरजेचे आहे. लोकांच्या सहवासात याल. मात्र, तुमचे पाय मागे ओढणाऱ्या लोकांना टाळणे शहाणपणाचे ठरेल. 

कन्या - महत्त्वाची कामे करण्यासाठी अनुकूल परिस्थिती राहिल. लोकांचे सर्वोतोपरी सहकार्य मिळेल. नशिबाची अनुकूलता तुमच्या बाजुने राहिल. महत्त्वाच्या बातम्या कानावर पडतील. मुलांना योग्य संधी मिळतील, जोडीदार चांगली साथ देईल. 

तूळ - कामाचा व्याप सांभाळताना धावपळ होईल. थोडे स्थीर चित्ताने काम करण्याची गरज आहे. कामे घाईघाईने करू नका, एखादे काम कमी झाले तरी चालेल. पण, चुका टाळा. कामानिमित्त प्रवास करण्याची वेळ आल्यास नीट नियोजन करा. 

वृश्चिक - व्यवसायात विक्री चांगली होईल. एखाद्या मोठ्या प्रकल्पात सहभागी व्हाल, त्यात फायदा होईल. लोकांचे सहकार्य मिळेल. नवीन माहिती कळेल, जोडीदार चांगली साथ देईल. जोडीदाराच्या सल्ल्याने वागणे इष्ट ठरेल. कामात यश येईल.  

धनू - आर्थिक आवक चांगली राहिल. जुनी येणी वसुल होतील. सरकारी कामांसाठी चकरा माराव्या लागतील. थोडा संयम ठेवलेला बरा. थोरामोठ्यांच्या सहवासात याल. नवीन माहिती कळेल, ती उपयुक्त ठरेल. नोकरीत प्रगती होईल. शरीर प्रकृतीकडे लक्ष्य द्या. 

मकर - ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजुने राहिल. व्यवसायात भरभराट होईल. नोकरीत प्रगतीला पूरक वातावरण राहिल. आपल्याला सुखसोयी वाढवून मिळतील. प्रवास कार्य साधक ठरेल. मुले प्रगती करतील. त्याचा आनंद वाटेल. जोडीदार चांगली साथ देईल. 

कुंभ - नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. विविध मार्गाने पैसे मिळतील. कामाचा व्याप वाढेल. एकावेळी अनेक कामे करण्याचा प्रयत्न करू नका. थकवाा जाणवेल. थोडा आराम करणे आवश्यक आहे. स्वत:चे राहणीमान झकपक ठेवा.  

मीन - नोकरीत कामाचा ताण वाढेल. सहकार्याची मदत मिळेल. कामाचे दडपण घेऊ नका. नातेवाईक जुने मित्र-मैत्रिणी यांच्या सहवासात याल. व्यवसायात गुंतवणूक करताना जाणकारांचा सल्ला घ्या.  

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य