शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य - १७ डिसेंबर २०२१; धनप्राप्तीचे योग, मालमत्तेच्या व्यवहारात फायदा होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 07:24 IST

Todays Horoscope 17 December 2021 : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष - मनावरचा ताण कमी होईल. नातेवाईकांच्या भेटी होतील. मित्र मैत्रिणी यांच्यासमावेत वेळ मजेत जाईल. नोकरीत चांगली परिस्थिती राहील. काही तरी नवीन करुन दाखवण्याची जिद्द राहील. वेळेचा सदुपयोग कराल.

वृषभ - काही कामे मार्गी लागतील. वादविवादात पडू नका. कुणाला दुखवू नका. आर्थिक आवक सामान्य राहील. नोकरीत संमिश्र परिस्थिती राहील. लोकांशी गोडीगुलाबीने वागा. वडिलोपर्जित मालमत्तेच्या व्यवहारात वाद होतील. मात्र तुमचे नुकसान होणार नाही.

मिथुन - जोडीदाराची चांगली साथ राहील. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. नोकरीत मनासारखी कामे होणार नाहीत. एखादी चांगली घटना घडेल. आपले महत्व वाढेल. खर्चाला आवर घातला पाहिजे. प्रवास शक्यतो टाळा. प्रवासात दगदग होईल.

कर्क - जीवनासाथीचे सहकार्य उपयुक्त ठरेल. आर्थिक आवक चांगली राहील. मात्र देण्याघेण्याचे व्यवहार जपून करा. मुलांशी वादविवाद होण्याची शक्यता आहे. नोकरीत सामान्य परिस्थिती राहील. नोकरी व्यवसायातील अस्थिरता कमी होईल. थोडा आराम करणे आवश्यक आहे.

सिंह - नोकरीत वादविवाद टाळा. संयमाने वागणे आवश्यक आहे. काहींना बदलीला सामोरे जावे लागेल. कामाचा व्याप सांभाळताना कसरत करावी लागेल. मुलांना अपेक्षित यश मिळेल. त्याची काळजी वाटणार नाही. आरोग्य सांभाळा

कन्या - नोकरीत तुमचे महत्त्व वाढेल. मात्र शब्द जपून वापरा. घरात आनंदी वातावरण राहील. मुलांना अपेक्षित यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. प्रवासात दगदग होईल. भावंडांशी गैरसमजातून वाद होण्याची शक्यता आहे. व्यवसायात सामान्य स्थिती राहील.

तूळ - व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. तुमच्या मनासारख्या उलाढाली होतील. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. नोकरीत चांगली परिस्थिती राहील. मुलांच्या प्रगतीकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. त्यांना तुमच्या मार्गदर्शनाची गरज पडेल.

वृश्चिक - धनप्राप्तीचे योग आहेत. मालमत्तेच्या व्यवहारात फायदा होईल. व्यवसायात भरभराट होईल. मात्र जीवनसाथीशी किरकोळ कारणावरुन वाद होऊ शकतात. मनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. नोकरीत चांगली परिस्थिती राहील.

धनू -  आर्थिक प्राप्ती मनासारखी होईल. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. महत्त्वाच्या कामात अडथळा येण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. व्यवसायात सावध पावले टाका. भावंडांकडून निराशा पदरी पडेल. जोडीदार चांगली साथ देईल.

मकर - जमीन, शेतीच्या माध्यमातून अर्थ लाभ होईल. मात्र व्यवहारात चोखपणा राहील. याची काळजी घ्या. जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल. जोडीदाराची काळजी घ्या. मुलांच्या अडचणी समजून घ्या. नोकरीत सामान्य परिस्थिती राहील.

कुंभ - महत्त्वाच्या व्यक्ती भेटतील. मित्रांचे सहकार्य मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील. चैनीच्या वस्तू खरेदी कराल. नोकरीत वाद होतील. बदलीची शक्यता आहे. कामात बदल होऊ शकतात. जीवनसाथी चांगली साथ देईल.

मीन -  आर्थिक आवक मनासारखी राहील. काहींना भेटवस्तू मिळतील. कायदेविषयक कामे मार्गी लागतील. सरकारी कामे होतील. प्रवासात सावधानता बाळगा. भावंडांशी वाद होतील. धार्मिक कार्यात भाग घ्याल.

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यhoroscope 2021राशिभविष्य २०२१