शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य ५ एप्रिल २०२२; नोकरीत कामाचा ताण वाढेल, तुमच्या घरी आज पाहुणे येतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 07:31 IST

Today's horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक चैत्र १५, १९४४. तिथी चैत्र शुक्ल चतुर्थ. (दुपारी ३.४६ पर्यंत), श्री शालिवाहन शके १९४४. शुभकृत नाम संवत्सर, नक्षत्र : दुपारी ४.४५ पर्यंत भरणी. त्यानंतर कृतिका रोहिणी : रास - वृषभ. आज : सामान्य दिवस. विनायक चतुर्थी, (अंगारक योग) : राहू काळ: दुपारी ३.०० ते ०४.३०. (राहू काळात महत्त्वाची कामे टाळा.)

मेष- महत्त्वाच्या कामात यश मिळेल. योग्य दिशेने वाटचाल सुरू राहिल. जाणकारांचे मार्गदर्शन मिळेल. धनलाभाच्या दृष्टीने अनुकूल काळ आहे. मनासारखे भोजन मिळेल, मालमत्तेची कामे मार्गी लागतील. अडचणी दूर होतील, लोकांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे. 

वृषभ - मनात सकारात्मक विचार राहतील. अडचणीतून मार्ग निघेल. महत्त्वाचे काम करायचे असेल तर चांगला काळ आहे. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहिल. विविध लाभ होतील. अनेकांचे सहकार्य मिळेल. जीवनसाथीशी सूर जुळतील. 

मिथून - दूरच्या प्रवासाचे योग येतील, पर्यटनाच्या निमित्ताने फिरणे होईल. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. आर्थिक व्यवहार जपून करणे आवश्यक आहे. स्वत:हून कोणाला सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नका, अन्यथा मनस्ताप सहन करावा लागेल. 

कर्क - विविध प्रकारचे लाभ होतील. तुमचा ज्यांच्यावर लोभ आहे, असे लोक भेटतील. आर्थिक आवक चांगली राहिल. तुमचे महत्त्व लोकांच्या लक्षात येईल. मानसन्मान मिळेल. मनात सकारात्मक विचार ठेवा. लोक तुमच्या माघारी कौतूक करतील. 

सिंह - नोकरीत कामाचा ताण वाढेल. काहींना बदलीला सामोरे जावे लागेल. घरातील कामाचा पाठपुरावा करावा लागेल. सतत कार्यरत राहाल, वेळात वेळ काढून थोडा आराम करणे आवश्यक राहिल. घरी पाहुणे येतील. 

कन्या - भाग्याची चांगली साथ राहिल. अडचणी दूर होतील. काम करण्यासाठी उत्साह राहिल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. जीवनसाथीचे चांगले सहकार्य मिळेल. आवडत्या छंदासाठी वेळ काढा. 

तूळ - मुलांशी संवाद साधला पाहिजे. त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी वेळ काढा. नोकरीत तणाव राहिल. कामाचा व्याप सांभाळताना तारेवरची कसरत होईल. प्रवास शक्यतो टाळा, दगदग होईल अशी कामे नको. महत्त्वाच्या कामात अडचण येईल. 

वृश्चिक - ग्रहमान अनुकूल राहिल, अडचणीतून मार्ग निघेल. महत्त्वाचे काम हाती घेण्यास हरकत नाही. जीवनसाथी आपल्याला सांभाळून घेईल. भागिदारी व्यवसायात यश मिळेल. धाडसी निर्णय घेण्याकडे कल राहिल. मुलांना यश मिळेल. 

धनू - नोकरीत चांगली परिस्थिती राहिल. महत्त्वाच्या जबाबदाऱ्या अंगावर पडतील. कामाचा ताण वाढेल, आरोग्याची काळजी घ्या. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील, वडिलधाऱ्या मंडळींचा सल्ला उपयुक्त ठरेल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. 

मकर - मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील. त्यांना योग्यतेनुसार संधी मिळेल. प्रसिद्धी, मानसन्मान मिळेल. जीवनसाथीचे प्रेम मिळेल. एखादी भेटवस्तू देण्यास हरकत नाही. नोकरीत लाभदायक काळ आहे. व्यवसायात आपली वरचढ बाजू राहिल. 

कुंभ - नोकरीत धावपळ करावी लागेल. सतत कार्यरत राहाल. नवीन जबाबदारी अंगावर पडेल. कामाचे स्वरुप बदलेल. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर संधी मिळेल. घरी पाहुणे येतील. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. 

मीन - भावंडाच्या भेटीगाठी होतील. व्यावसायात विक्री चांगली राहिल. बाजारपेठेचे तुमचे अंदाज चुकू शकतात. जपून गुंतवणूक केली पाहिजे. नोकरीत दगदग होईल. मात्र, अनेकांचे सहकार्य मिळेल. मनातील काळजीचे विचार झटकून टाका.  

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य