मेष – मन प्रसन्न राहील. घरात उत्साही वातावरण राहील. चांगल्या बातम्या कानावर पडतील. मुलांच्या यशामुळे आभाळ ठेंगणं वाटेल. काहींना प्रवास करावा लागेल. तुमच्या बोलण्यामुळे लोकांना प्रेरणा मिळेल. तुमच्या मान सन्मानात वाढ होईल. धनलाभ होईल.
वृषभ – नोकरीत अनुकूल ठिकाणी बदली होण्याची शक्यता आहे. काहींच्या कामात बदल होईल. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर संधी मिळेल. घरात आनंदी वातावरण राहील. खाण्यापिण्याची चंगळ राहील. जवळच्या लोकांच्या भेटीगाठी होतील.
मिथुन – पर्यटनस्थळांना भेटी द्याल. मित्रमंडळीत मन रमेल. व्यवसायात भरभराट होईल. चांगल्या बातम्या कळतील. महत्त्वाचे निरोप येतील. जोडीदाराशी मधूर संबंध राहतील. व्यवसायात चांगले निर्णय घेऊ शकता. जास्त दगदग न करता आराम करणे योग्य ठरेल.
कर्क – विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल. मालमत्तेची कामे तुमच्या मनाप्रमाणे होतील. जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल. आवडीचे पदार्थ तुमच्या भोजनाच्या ताटात दिसतील. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. कुटुंबातील सदस्यांमध्ये समन्वय ऱाहील.
सिंह – चांगल्या बातम्या कानावर पडतील. मुलांना घवघवीत यश मिळेल. चांगल्या संधी चालून येतील. नशीबाची साथ मिळेल. नवीन उपक्रम हाती घेतले जातील. लोकांशी गोडीगुलाबीने वागा. सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हाल.
कन्या – योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन मिळेल. त्यामुळे अडचणीतून मार्ग काढाल. महत्त्वाचे काम पुढे ढकला. अन्यथा दगदग, धावपळ होईल. प्रवासात सावधानता बाळगा. नोकरीत तुमचे वर्चस्व राहील. मात्र कामाचा ताण वाढेल. प्राधान्यक्रम ठरवून कामे करा.
तूळ – नोकरीत प्रगतीला पूरक वातावरण राहील. आर्थिक आवक चांगली राहील. घरात आनंदी वातावरण राहील. गोडधोड पदार्थ खाण्यास मिळतील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवून कामे कराल. मुलांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा कराल.
वृश्चिक – नवीन नोकरीच्या शोधात असाल तर चांगली संधी मिळेल. काहींना नोकरीत बदल स्वीकारावा लागेल. घरात किरकोळ कारणावरून कुरबूर होईल. पैशांचा ओघ चांगला राहील. महत्त्वाच्या विषयावर चांगली माहिती मिळेल. त्याचा निश्चितच फायदा होईल,
धनू – ग्रहमान अनुकूल राहील. सर्वांचे सहकार्य मिळेल. नशीबाची साथ मिळेल. महत्त्वाचे काम मार्गी लागेल. जोडीदाराशी मधूर संबंध राहतील. आर्थिक आवक चांगली राहील. ज्या कामात हात घालाल त्यात यश मिळेल. नोकरीत अनुकूल घटना घडतील.
मकर – महत्त्वाचे काम थोडे पुढे ढकलणे इष्ट ठरेल. संयमानं वागणे आवश्यक आहे. काहींना अचानक धनलाभ होईल. लॉटरीचे एखादे तिकीट घेऊन पाहण्यास हरकत नाही. आर्थिक आवक चांगली राहील. जुनी येणी वसूल होतील. जोडीदार साथ देईल. प्रवासात दगदग होईल.
कुंभ – व्यवसायात भरभराट होईल. नोकरीत तुमचे पारडे जड राहील. प्रतिष्ठा प्राप्त होईल. नशिबाची साथ मिळेल. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल आणि कामे मार्गी लागतील. भेटवस्तू मिळतील. अनावश्यक खर्च करण्याकडे कल राहील.
मीन – प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू राहील. काही कारणाने एकाद्या कामात अडथळा येऊ शकतो. पण अशावेळी थोडे संयमाने वागणे आवश्यक आहे. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. धनलाभाच्या दृष्टीनं चांगला काळ आहे. आरोग्याला जपा.