शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य - १८ डिसेंबर २०२१; महत्त्वाचे काम पुढे ढकलता आले तर बरे होईल, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2021 07:30 IST

Todays Horoscope 18 December 2021 : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष – जवळच्या लोकांशी संवाद राहील. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. मनात सकारात्मक विचार राहतील. कामे आटोक्यात येतील. कामाचा ताण कमी होईल. पैशाचा ओघ सुरु राहील. आवडत्या छंदासाठी वेळ देता येईल. व्यवसायात भरभराट राहील.

वृषभ – एखाद्या कामात अनुकूल परिणाम दिसून येईल. गरजेपुरते पैसे मिळतील. नोकरीत काही चांगले तर काही कटू अनुभव येतील. लोकांच्या भावना समजून घ्या. कुणाचा अपमान करु नका. तब्येतीकडे दुर्लक्ष करु नका. ऐनवेळी कुणाची तरी मदत मिळेल.

मिथुन – महत्त्वाचे काम पुढे ढकलता आले तर बरे होईल. अन्यथा दगदग होईल. थोडे संयमाने वागणे आवश्यक आहे. मित्र, जवळचे लोक यांचे सहकार्य मिळेल. जीवनसाथीची मदत मिळेल. व्यवसायात भरभराट होईल. प्रवासात सावधानता बाळगणे आवश्यक आहे.

कर्क – नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. तुमच्या फायद्याचे निर्णय घेतले जातील. पैशाची आवक चालू राहील. कुणाला उसने पैसे देताना विचार करुन द्या. दगदग होईल अशी कामे करु नका. मुलांना रागवू नका. आपल्या कामाची प्रशंसा होईल.

सिंह – नोकरीत नवीन जबाबदारी अंगावर पडेल. त्यात आपल्याला खूप व्यस्त राहावे लागेल. एखाद्या मुद्यावर मतभेद होतील. गोडीगुलाबीने काम करुन घ्या. महत्त्वाच्या कामात जाणकारांचा सल्ला घ्या

कन्या – नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. एखाद्याचा अपमान होईल असे बोलू नका. मुलांची प्रगतीकडे वाटचाल सुरु राहील. काहींना प्रवास करावा लागेल. प्रवासात काळजी घ्या. नातेवाईकांशी वाद होण्याची शक्यता आहे. शब्द जपून वापरा

तूळ – नोकरीत अनुकूल घटना घडतील. व्यवसायात बरकत राहील. एखाद्या व्यवहारात चांगला फायदा होईल. घरात आनंदी वातावरण राहील. महत्त्वाचे काम शक्यतो पुढे ढकला. मुलांची काळजी घ्या. त्यांना काय हवे नको ते पाहा. उसने पैसे देताना विचार करुन घ्या

वृश्चिक – व्यवसायात आगेकूच सुरु राहील. विक्री चांगली होईल. नफ्याचे प्रमाण वाढेल. विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल. घर जमिनीचे व्यवहार लाभदायक ठरतील. नोकरीत प्रगती होईल. जीवनसाथीला नाराज करु नका. पूजाअर्चा करण्यात मन रमेल

धनू – विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल. जीवनसाथीचे सहकार्य मिळेल. व्यवसायात एखादा अंदाज चुकू शकतो. खबरदारी घेणे योग्य ठरेल. नातेवाईकांकडून अपेक्षाभंग होईल. तब्येतीकडे दुर्लक्ष करु नका. महत्त्वाचे काम पुढे ढकला. मुलांना काय हवे नको ते विचारा.

मकर – मनात आनंदी व सकारात्मक विचार राहतील. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. उसने पैसे देताना विचार करुन द्या. एखाद्या सामाजिक कार्यक्रमात भाग घ्याल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. आरोग्य सांभाळा. जोडीदाराशी मधुर संबंध राहतील.

कुंभ – अनुकूल परिस्थिती राहील. पैशाचा ओघ सुरु राहील. खर्च करण्याकडे कल राहील. जवळचे लोक भेटतील. काहींना नवीन नोकरी मिळेल. सहनशक्तीची परीक्षा पाहिली जाऊ शकते. आपण त्यात उत्तीर्ण व्हाल

मीन – धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. जुनी येणी अनपेक्षितपणे वसूल होतील. जवळच्या लोकांशी संवाद तोडू नका. वैचारिक आदानप्रदान राहील असे बघा. विविध प्रकारच्या कामांना गती मिळेल. प्रवासात दगदग होईल.

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यhoroscope 2021राशिभविष्य २०२१