शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य - १६ डिसेंबर २०२१; भाग्याची उत्तम साथ, एखादी अनपेक्षित संधी मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 07:47 IST

Todays Horoscope 16 December 2021 : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष - अस्थिर परिस्थिती राहील. अनिश्चिततेचे वातावरण असल्याने घालमेल होईल. संयमाने वागणे आवश्यक आहे. दुपारच्या सत्रात हाती घेतलेली कामे मार्गी लागतील. आर्थिक आवक चांगली राहील. नोकरीत कामाचा ताण कमी राहील.

वृषभ - महत्त्वाची कामे दुपारनंतर हाती घ्या. प्रवास करताना खबरदारी घ्या. काहींचा प्रवासाचे बेत अचानक रद्द होईल. रागाच्या भरात कुणाचा अपमान करु नका. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. मात्र एखाद्या कामात दिरंगाई होईल. त्याचे खापर तुमच्यावर फोडले जाईल

मिथुन - अचानक धनलाभ होईल. महत्त्वाचे काम दुपारच्या आत उरका. प्रवासात काळजी घ्या. एखादी अनपेक्षित बातमी कानावर पडेल. जोडीदाराशी मधुर संबंध राहतील. मात्र आपण हुकुमत गाजवण्याचा प्रयत्न करू नका. जमिनीच्या व्यवहारात सावधानता बाळगा

कर्क - नोकरीतील अस्थिरता कमी होईल. काही कामे होतील. झटपट निर्णय घेण्याच्या नादात चुका करु नका. घरात थोडी धावपळ करावी लागेल. मुलांची आबाळ होणार नाही. याची दक्षता घ्या. जोडीदाराशी नात्यात गोडवा राहील. धनलाभ होईल.

सिंह - अचानक प्रवासाचे बेत ठरतील. भाग्याची उत्तम साथ राहील. एखादी अनपेक्षित संधी मिळेल. नोकरीत थोडी अस्थिरता जाणवेल. घरी पाहुणे येतील. घरात किरकोळ कारणावरुन कुरबुर होईल. मुलांना यश मिळेल.

कन्या - आर्थिक आवक चांगली राहील. काहींना प्रवास करावा लागेल. प्रवासात दगदग होण्याची शक्यता आहे. खाण्यापिण्यावर लक्ष द्या. थोडी काळजी घ्या. व्यवसायात वादविवाद होण्याची शक्यता आहे. नोकरीत तुमचा दबदबा राहील. सहकारी मदत करतील.

तूळ - महत्त्वाची काम दुपारच्या आत उरकून घ्या. प्रवास शक्यता टाळा. प्रवासात दगदग होईल. वाहन जपून चालवा. जोडीदाराशी वाद घालू नका. घरात खाण्यापिण्याची रेलचेल राहील. येणाऱ्या जाणाऱ्यांचा राबता राहील. व्यवसायात विक्री चांगली राहील.

वृश्चिक - आर्थिक बाजू चांगली राहील. धनलक्ष्मीची कृपा राहील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. व्यवसायात विक्री चांगली होईल. महत्त्वाच्या कामासाठी दगदग होईल. काही ना काही खुसपट निघत राहील. जोडीदाराशी वाद होतील. थोडी आपणच माघार घ्यावी.

धनू -  पैशांची आवक चांगली राहील. जुन्या व्यवहाराचा लाभ होईल. जोडीदाराशी नात्यात गोडवा राहील. जोडीदार तुमच्या मर्जीनुसार वागेल. व्यवसायाचा अंदाज येणार नाही. दगदगीची कामे टाळा. आरोग्याशी काळजी घ्या. हितशत्रू कारवाया करतील

मकर - एखाद्या व्यवहारात फायदा होईल. मात्र सावधानता बाळगा. जोडीदाराशी काळजी घ्या. घरात कामाची लगबग सुरु राहील. मुलांकडे दुर्लक्ष करू नका. त्यांना योग्य मार्गदर्शन करा. नोकरीत संयमाने बोलणे आवश्यक आहे.

कुंभ - नोकरीत वादाचे प्रसंग होतील. कामात साधकबाधक बदल होतील. घरात थोडा तणाव राहील. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. खर्च करण्याकडे कल राहील. व्यवसायात भरभराट होईल. अचानक प्रवास करावा लागेल.

मीन -  नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. तुमच्या हिताचे निर्णय घेतले जातील. एखादा सौदा फायदेशीर ठरेल. जवळचे प्रवास होतील. प्रवासात काळजी घ्या. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. परस्पर समन्वय राहील

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यhoroscope 2021राशिभविष्य २०२१