शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य - १५ डिसेंबर २०२१; नोकरीत मनाविरुद्ध घटना घडू शकते, मात्र...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 07:31 IST

Todays Horoscope 15 December 2021 : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस.

मेष - नोकरीत चांगली परिस्थिती राहील. मनात विचारांचे काहूर माजेल. नकारात्मक विचारांपासून दूर राहा. योग्य व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल आणि कामे मार्गी लागतील. जोडीदाराशी वाद घालू नका. आर्थिक बाजू चांगली राहील.

वृषभ - महत्त्वाची कामे पुढे ढकला. नोकरीत सावधपणे वागणे आवश्यक आहे. कुठल्याही विषयावर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. काहींना प्रवास करावा लागेल. प्रवासात दगदग होईल. कागदपत्रांची तपासणी करुन मगच सही करा. ऑनलाईन व्यवहार करताना खबरदारी घ्या

मिथुन - आपले बाजारपेठेचे अंदाज बरोबर ठरतील. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. जुनी येणी अनपेक्षितपणे वसूल होतील. उसने पैसे देताना विचार करुन घ्या. तुमच्या भिडस्तपणाचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. जोडीदार तुमच्या मर्जीनुसार वागेल

कर्क - नोकरीत नवीन जबाबदारी घ्यावी लागेल. जपून बोलणे योग्य ठरेल. समाजसेवा करण्यासाठी पुढाकार घ्याल. एखाद्या छोटेखानी समारंभात सहभागी व्हाल. लोकांच्या भेटीगाठी होतील. जीवनसाथीचे चांगले सहकार्य मिळेल. आत्मविश्वासाने कामे कराल.

सिंह - महत्त्वाचे काम मार्गी लागेल. महत्त्वाच्या व्यक्तींची भेट होईल. तुमचे महत्त्व वाढेल. आर्थिक आवक चांगली राहील. विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. मुलांना यश मिळेल. त्यांची कामे पूर्ण होतील.

कन्या - कामाच्या निमित्ताने थोडी धावपळ करावी लागेल. त्यामुळे थोडा थकवा जाणवेल. धनप्राप्तीचे योग आहेत. कायद्याची बंधने पाळण्यात हित राहील. व्यवसायात भरभराट होईल. प्रवासात काळजी घ्या. तुमची गोपनीय माहिती कुणाला देऊ नका.

तूळ - जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. लोकांच्या भेटीगाठी होतील. कामे आटोक्यात येतील. खिशात पैसे खुळखुळतील. जोडीदाराशी वाद घालू नका. नोकरीत मनाविरुद्ध घटना घडू शकते. मात्र आपण कामावर लक्ष केंद्रीत कराल. त्यामुळे तुमची बाजू बळकट राहील.

वृश्चिक - नोकरीत चांगली परिस्थिती राहील. कामाचा ताण कमी होईल. खर्चाचे प्रमाण वाढेल. त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. व्यवसायात भरभराट होईल. नफ्याचे प्रमाण वाढेल. तब्येतीची काळजी घ्या. दगदग होईल. अशी कामे करू नका. जोडीदार तुमची काळजी घेईल.

धनु -  मुलांच्या यशाचा आनंद साजरा कराल. महत्त्वाचे निरोप येतील. मनासारखे भोजन मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील. मुलांच्या यशामुळे घरामध्ये उत्साह राहील. जोडीदार तुमच्या मर्जीनुसार वागेल.काहींना प्रवास घडेल. प्रवासात जास्त खर्च होईल.

मकर - प्रवासाचे योग आहेत. पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास होतील. घर, जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. पैशाचा ओघ चांगला राहील. नोकरीत मनाविरुद्ध घटना घडतील. नवीन जबाबदारी अंगावर पडेल. थोडा संयम ठेवलेला बरा. नातेवाईकांच्या भेटी होतील.

कुंभ - मनात सकारात्मक विचार राहतील. महत्त्वाचे काम मार्गी लागेल. दगदग कमी होईल. कायद्याची बंधने पाळा. प्रवासात सावधानता बाळगा. मनासारखी खरेदी करता येईल. नातेवाईकांच्या भेटी होतील. त्यांच्याशी सुसंवाद राहील.

मीन -  अडून राहिलेली कामे होतील. महत्त्वाचे निरोप येतील. घरात आनंदी वातावरण राहील. मनासारखे भोजन मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील. अचानक एखादा लाभ होईल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील.  

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यhoroscope 2021राशिभविष्य २०२१