शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

राशीभविष्य - ३१ जानेवारी २०२२: तरुणांनी चांगल्या मित्रांसोबत राहावे, 'या' राशीला मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 07:36 IST

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष- नोकरीत अडचणींन तोंड द्यावे लागेल, काहींना मनाविरुद्ध बदलीला सामोरे जावे लागेल. सहकाऱ्यांशी जुळवून घेतलेले बरे राहिल, घरी पाहुणे येतील. महिलांना धावपळ करावी लागेल. जीवनासाथी चांगली साथ देईल, मुलांच्या अडचणी समजून घ्या.

वृषभ- संमिश्र ग्रहमान अनुभवण्यास मिळेल. काहींना प्रवास करावा लागेल, प्रवासात काळजी घ्या. तरुणांनी चांगल्या मित्रासोबत राहावे, वेळ आणि पैसा खर्च करायला लावणाऱ्या मित्रांना दूर ठेवा. जीवनसाथी व घरातील इतरांच्या तब्येतीची काळजी घ्या. आर्थिक आवक चांगली राहिल. 

मिथुन- जोडीदाराची चांगली साथ राहिल, थोडं क्रोधाला आवर घातली पाहिजे. नोकरीत वादाचे प्रसंग येतील, हितशत्रू डोकं वर काढतील. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. घाईघाईत कामे करू नका. प्रवास शक्यतो टाळा, वाहने जपून चालवा. रहदारीचे नियम पाळा. 

कर्क- आरोग्याची काळजी घ्या, बाहेरचे चमचमीत पदार्थ खाणे टाळा. जोडीदार आपल्याला साथ देईल. पण, आपण थोडे संयमाने वागा. नोकरीत काही अडचणी येतील, त्या संयमाने सोडवा. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. 

सिंह- विद्यार्थ्यांना उल्लेखनीय यश मिळेल, त्यांचा आत्मविश्वास वाढेल. आरोग्याची काळजी घ्या. सकल हलका आहार घेतला पाहिजे. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील, संयमाने वागण्याची गरज आहे. नोकरीत वादापासून दूर राहा. 

कन्या- घरात आनंदी वातावरण राहिल. नवीन वस्तू खरेदी कराल, नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. मात्र, काही सहकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. मुलांना यश मिळेल. मात्र, काही अडचणींना तोंड द्यावे लागेल. आरोग्याची काळजी घ्या. 

तूळ- घरात वादविवाद होण्याची शक्यता आहे, थोडे संयमाने वागणे चांगले आहे. नोकरीत बदली होऊ शकते, कामाचा ताण वाढेल. डोक्याला एखाद्या गोष्टीचा वैताग येईल. व्यवसायात विक्री चांगली राहिल, ग्राहकांची वर्दळ वाढेल. 

वृश्चिक- जवळचा प्रवास करावा लागेल. प्रवासात दगदग होईल. व्यवसायात आर्थिक आवक चांगली राहिल. मात्र, एखादा मोठा निर्णय चुकूही शकतो. त्यामुळे, माहितगाराचा सल्ला घेतलेला बरा. धनलाभाच्यादृष्टीने चांगला काळ आहे, खाण्या-पिण्याची चंगळ राहिल. 

धनु- जीवनसाथीची मोलाची मदत मिळेल, नात्यात गोडवा राहिल. खाण्यापिण्याची चंगळ राहिल. आर्थिक आवक चांगली राहिल, मोठी कामे होतील. पण, त्यात बराच वैताग राहिल. संयम सोडता कामा नये, अध्यात्माकडे काहींचा कल आहे. 

मकर- खर्चाचे प्रमाण वाढते राहिल, आरोग्याची काळजी घ्या. जास्त दगदग करू नका, काळजीचे विचार न करता सकारात्मक विचार करा. एखाद्या व्यवहारात फायदा होईल. मनात अध्यात्मिक विचार राहतील. नोकरीत संमिश्र परिस्थिती राहिल. 

कुंभ- आर्थिक आवक चांगली राहिल, जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. कामे झालीच पाहिजे, असा अट्टहास नको. थोडे सबुरीने वागण्याची गरज आहे. प्रवासात सामान व कागदपत्रांची काळजी घ्या. 

मीन- अनुकूल वातावरण राहिल, सरकारी कामे मार्गी लागतील. मात्र, कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी आटापिटा करावा लागेल. व्यवसायात धाडसी निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र, जाणकारांचा सल्ला घ्या.  

टॅग्स :Astrologyफलज्योतिषhoroscope 2021राशिभविष्य २०२१