शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
4
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
7
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
10
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
11
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
12
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
13
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
14
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
15
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
16
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
17
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
18
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
19
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

राशीभविष्य - १५ ऑगस्ट २०२२: वाहनाच्या दुरुस्तीकडे वेळीच लक्ष द्या; नोकरीत वादापासून दूर राहा, अचानक धनलाभ होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2022 07:43 IST

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष - मनात धार्मिक विचार राहतील. दानधर्म, पूजापाठ यांत मन रमेल. त्याप्रीत्यर्थ खर्च कराल. काहींना प्रवास करावा लागेल. नोकरीत अतिशय अनुकूल परिस्थिती राहील. एखादी मोठी संधी मिळू शकते. त्यासाठी स्वत:ला सज्ज ठेवा. आत्मविश्वासाने कामे करा.

वृषभ- धनलक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील. मनासारखी आवक राहील. विविध प्रकारचे लाभ होतील. लोकांचे सहकार्य मिळेल. मोठ्या संधी मिळतील. उत्तम प्रवास राहील. व्यवसायात भरभराट होईल. नोकरीत तुमचे म्हणणे इतरांना पटेल. वरिष्ठंची शाबासकी मिळेल.

मिथुन -  नोकरीत तुमचा प्रभाव पडेल. काही अनुकूल बदल होतील. एखादे मोठे पद मिळू शकते. त्यातून आर्थिक फायदा होईल. घरी पाहुणे येतील. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. खाण्यापिण्याची चंगळ राहील. मोठ्या आत्मविश्वासाने प्रवास वाटचाल कराल. 

कर्क - भाग्याची चांगली साथ तुम्हाला मिळेल. अडचणी दूर होतील. दगदग कमी होईल. मनासारखे फिरणे होईल. पर्यटनाचा आनंद मिळेल. तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. प्रसिद्धी मानसन्मान मिळेल. चांगली बातमी मिळेल.

सिंह -  अचानक धनलाभ होईल. कामचा ताण वाढेल. सतत कार्यरत रहावे लागेल. त्यामुळे आरामासाठी वेळ मिळणार नाही. नोकरीत वादापासून दूर राहा. खर्चाला आवर घातला पाहिजे. वाहनाच्या दुरुस्तीकडे वेळीच लक्ष द्या.

कन्या -  अडचणी दूर होतील. सहजासहजी यश मिळेल. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. प्रेमात असणाऱ्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळेल. आर्थिक आवाक मनासारखी राहील. चैनिच्या वस्तू खरेदी कराल. सरकारी कामे मार्गी लागतील.

तूळ- घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. नवीन वस्तू खरेदी कराल. महत्वाच्या कामात अडचणी येतील. आरोग्याची काळजी घ्या. पोट बिघडणार नाही, अशा बेतानेच मेजवानीवर ताव मारा. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. आर्थिक आवाक चांगली राहील.

वृश्चिक - महत्वाच्या कामात यश मिळेल. मुलांच्या प्रगतीच्या दृष्टीने चांगला काळ आहे. तुमच्या नावलौकिकात भर पडणाऱ्या घटना घडतील. काहींना प्रवास घडून येतील. यश मिळत असल्याने कुणाला हिणवून बोलू नका. जीवनसाथी चांगली साथ देईल.

धनु - घरात आनंदी वातावरण राहील. एखाद्या छोट्याशा कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. त्यानिमित्ताने इष्टमित्र, नातेवाईकांच्या भेटी होतील. नोकरीत एकंदरीत अनुकूल परिस्थिती राहील. जीवनसाथीचे सहकार्य मिळेल. महत्वाचे काम मार्गी लागेल.

मकर - जीवनसथीच्या सहयोगाने महत्वाच्या कामात सफलता मिळेल. जीवनसाथीला भेटवस्तू द्या. भावंडांच्या भेटीगाठी होतील. त्यांच्यासमावेत मजेत वेळ जाईल. व्यवसायात भरभराट होईल. भागीदारांचे, मित्रांचे सहकार्य मिळेल.

कुंभ- धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील. मनासारखी आर्थिक आवक राहील. जमीनजुमल्याच्या व्यवहारात फायदा होईल. आवडत्या पदाचा आस्वाद घेता येईल. नोकरीत तुमचे वर्चस्व राहील. महत्वाच्या कामात सफलता मिळेल.

मीन- व्यवसायात थोडे धाडस दाखवाल. अडचणी संपतील. मनात आनंदी विचार राहतील. महत्वाच्या कामात यश मिळेल. जीवनसाथीचे प्रेम मिळेल. आर्थिक बाजू ठीकठाक राहील. वसुलीसाठी तगादा लावावा लागेल. 

- विजय देशपांडे (ज्योतिष विशारद)

टॅग्स :Astrologyफलज्योतिष