शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

आता नेमके मैदानात कुणाला उतरवायचे? भाजपापुढे निर्माण झाला पेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2023 10:13 IST

वसुंधरा राजे, मंत्र्यांमुळे निर्माण झाला पेच

हरीश गुप्ता/संजय शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा समावेश असलेले भाजपचे सर्वोच्च नेतृत्व जयपूरमध्ये जात असून, राजस्थान, मध्यप्रदेशसह पाच राज्यांत होत असलेल्या विधानसभा निवडणुकीची रणनीती तयार करण्यासाठी कोअर समितीची बैठक होत आहे.     केंद्रीय मंत्री व काही खासदारांसह सर्व ज्येष्ठ नेत्यांना विधानसभा निवडणुकीत सामूहिक नेतृत्व या तत्त्वावर उतरवायचे की वेगळी रणनीती आखायची, या महत्त्वाच्या मुद्द्यांबाबत चर्चा होत आहे. भाजपने विद्यमान मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या नावाला बगल देत मध्यप्रदेशात तीन केंद्रीय मंत्री व काही खासदारांना उमेदवारी दिली आहे. मध्यप्रदेशप्रमाणे नवीन चेहरे आणायचे की जुन्या जाणत्या चेहऱ्यांना पुन्हा संधी द्यायची, याचा निर्णय कोअर कमिटी घेईल. माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे सिंधिया यांना पक्षाचा चेहरा म्हणून जाहीर न केल्यास नाराजी वाढणार आहे. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि अर्जुन राम मेघवाल तसेच डॉ. किरोडी लाल मीणा, दिया कुमारी, राज्यवर्धन राठोड आणि सुखवीर सिंह जौनपुरिया यांच्यासह अनेक खासदार प्रतीक्षेत आहेत.

नाराज नेमके कुणाला करावे?n हायकमांड वसुंधराराजे सिंधिया यांना पक्षाचा चेहरा म्हणून जाहीर करण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे दिसते; परंतु, त्याचबरोबर दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या वसुंधराराजे यांचा मोठा प्रभाव असल्याने त्यांना नाराज करण्याच्याही स्थितीत नाही.n इतर ज्येष्ठ नेत्यांना तिकिटे दिली आणि त्यांना दिले नाही तर राज्यात पक्षाला मोठे नुकसान होऊ शकते. असे झाल्यास राज्यात सत्ताविरोधी लाटेचा फायदा घेऊ शकतो, असे वाटत असलेल्या पक्षाला हे परवडणारे नाही.

लोकसभेची रणनीतीn या पाच राज्यांत भाजपची एकमेव मध्य प्रदेशात सत्ता आहे. राजस्थानमध्ये भाजप सत्तेसाठी प्रयत्न करीत आहे. n छत्तीसगड व तेलंगणामध्ये भाजप फार मागे आहे तर मिझोराममध्येही भाजप सत्तेपासून दूर आहे. पाच राज्यांतील निवडणुकीचे निकाल २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची रणनीतीही तयार करतील. n महिला मतदार महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर मत देत आहेत का व कोणाला देत आहेत, हेही यातून स्पष्ट होणार आहे.

महिला आरक्षणाची लिटमस टेस्ट सुरूn महिलांना आरक्षण देणारे विधेयक संसदेत पारित केल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवडणूक होणाऱ्या राज्यांत जाहीर सभा घेण्याबरोबरच महिलांकडून अभिनंदनाचे कार्यक्रमही घेण्यात येणार आहेत. महिला मतदारांना या निमित्ताने जोडण्यात येणार आहे. n महिला आरक्षण विधेयक संसदेत पारित केल्यानंतर या विधेयकाची पहिली लिटमस टेस्ट पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये नोव्हेंबरमध्ये होणार आहे. महिला आरक्षणाचा कोणत्या पक्षाला निवडणुकीच्या दृष्टीने फायदा झाला, हे पाच राज्यांतील निवडणूक निकाल सांगणार आहेत.  n महिलांकडून मोदींचे अभिनंदन करण्याचा कार्यक्रमही तयार झाला आहे.

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारण