शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

...तर राजीनामा द्या अन् निवडणूक मैदानात या! , अमित शाह यांचे मुख्यमंत्री गेहलोत यांना खुले आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2023 01:56 IST

राजस्थानमधील गंगापूर शहरात सहकार किसान मेळाव्याला संबोधित करताना शाह बोलत होते.

जयपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी ‘लाल डायरी’च्या मुद्द्यावरून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर निशाणा साधला. या मुद्द्यावर गेहलोत यांनी राजीनामा देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरावे, असे ते म्हणाले.

राजस्थानमधील गंगापूर शहरात सहकार किसान मेळाव्याला संबोधित करताना शाह बोलत होते. ते म्हणाले, “आजकाल गेहलोत साहेब लाल डायरीला खूपच घाबरतात. का बरं घाबरत असतील... राजस्थानच्या लोकांनो तुम्हीच सांगा?... डायरीचा वरचा भाग लाल असला तरी आत काळे कारनामे दडलेले आहेत.

कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचा लेखाजोखा त्या डायरीत आहे. मी गेहलोत यांना हे सांगायला येथे आलो आहे की, थोडीशी चाड उरली असेल तर लाल डायरीच्या मुद्द्यावर राजीनामा द्या आणि निवडणुकीच्या मैदानात या… दोन हात करा.’’ (वृत्तसंस्था)

भाजपने शेतकऱ्यांसाठी भरीव काम केलेयापूर्वीच्या काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांसाठी काहीही केले नाही, तर भाजपने शेतकऱ्यांसाठी भरीव काम केले. अनेक योजना सुरू केल्या, असा दावा शाह यांनी केला. ‘‘काँग्रेस सरकार सत्तेवर असताना कृषी बजेट २२ हजार कोटी रुपयांचे होते, जे मोदीजींनी सहा पटीने वाढवून एक लाख २५ हजार कोटी रुपये केले,’’ असे ते म्हणाले. यावेळी खासदार सुखबीरसिंग जौनपुरिया व जसकौर मीना, राज्यसभा सदस्य किरोरी लाल मीना आणि विरोधी पक्षनेते राजेंद्र राठोड उपस्थित होते.    

घरात लाल रंगाची डायरी ठेवू नका... भाषणाच्या शेवटी ते तिरकसपणे म्हणाले, “घरात डायरी काेणतीही असू द्या; पण तिचा रंग लाल असू नये. नाहीतर गेहलोत यांना राग येईल. राजस्थानचे बडतर्फ मंत्री राजेंद्र गुडा यांनी २४ जुलै रोजी विधानसभेत कथित ‘लाल डायरी’चा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर सभागृहात गदारोळ होऊन त्यांना निलंबित करण्यात आले होते.’’ शाह यांच्या भाषणाच्या सुरुवातीला काही लोक घोषणाबाजी करताना दिसले. याकडे लक्ष वेधत गृहमंत्री म्हणाले, “घोषणा देणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की, घोषणाबाजी करण्याऐवजी चंद्रयान पुढे ढकलले असते तर आज घोषणाबाजी करण्याची गरजच पडली नसती. सहकार मंत्रालयाची स्थापना केली असती, शेतकऱ्यांचे कल्याण झाले असते व आज घोषणाबाजी करण्याची गरज पडली नसती.’’

टॅग्स :Amit Shahअमित शाह