शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

राजस्थानचा निकाल ठरवणार देशाच्या राजकारणाचा मूड; लोकसभेच्या निवडणुकीतील मुद्दे होतील तयार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 08:11 IST

...परंतु लोकसभेच्या फायनलमध्ये देशाचा मूड कसा असेल हे मुख्यतः राजस्थानच्या निकालावर अवलंबून असेल. 

सुनील चावके -

नवी दिल्ली :  लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल समजल्या जाणाऱ्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये केंद्रातील सत्ताधारी भाजपची पीछेहाट होणार, अशी भाकिते निवडणूकपूर्व सर्वेक्षणामध्ये वर्तविली जात आहेत. परंतु लोकसभेच्या फायनलमध्ये देशाचा मूड कसा असेल हे मुख्यतः राजस्थानच्या निकालावर अवलंबून असेल. 

राजस्थानमध्ये सत्ताधारी पक्षाला पाच वर्षांची अँटी-इन्कम्बन्सी विरुद्ध केंद्रातील सरकारची दहा वर्षांची कामगिरी यावर निवडणूक होईल. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी गेहलोत यांचे नाव चर्चेत येताच त्यांना मुख्यमंत्रिपदावरून हटविण्यासाठी सचिन पायलट यांनी मोर्चेबांधणी केली, पण त्यांच्यातील शमलेला सत्तासंघर्ष काँग्रेस पक्ष लढतीत असल्याचा आभास निर्माण झाला आहे. 

भाजपचा भर मोदी करिष्म्यावर दुसरीकडे राजस्थानमध्ये हमखास यश मिळवून देणाऱ्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे शिंदे यांच्याऐवजी भाजप श्रेष्ठींनी सामूहिक नेतृत्वात निवडणूक लढविणार असल्याने त्यांच्या समर्थकांची निराशा झाली आहे. भाजपने २५ पैकी नऊ खासदारांना मैदानात उतरविले आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसह राजस्थानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच करिष्म्यावर भाजपने भर दिला आहे. विधानसभा निवडणुकांतील भाजपच्या या रणनीतीची सर्वात मोठी कसोटी राजस्थानमध्ये लागणार आहे.

‘इंडिया’च्या यशाची शाश्वती नाहीराजस्थानात दर पाच वर्षांनी अपरिहार्यपणे होणारा सत्ताबदल, सरकारविरोधी रोष आणि पक्षांतर्गत लाथाळ्यांवर मात करीत काँग्रेसला लागोपाठ दुसऱ्यांदा विजय मिळविणे जवळपास अशक्य मानले जात आहे. काँग्रेसने मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि अगदी मिझोराममध्ये नेत्रदीपक कामगिरी केली, तरी लोकसभा निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडीच्या यशाची शाश्वती देता येणार नाही, असे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकElectionनिवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेस