शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2024 18:38 IST

तापलेल्या वाळूत जवानांनी भाजले पापड-चपाती, अंडीही उकडली.

Summer in Rajasthan : यंदा अतिशय तीव्र उन्हाळा जाणवतोय. उत्तर भारतात तर सूर्य अक्षरशः आग ओकतोय. सर्वत्र इतकी प्रचंड उष्णता आहे की, जीवाची काहिली होत आहे. सरासरी तापमान 45-46 वरच पोहचले आहे. एकीकडे आपल्यासारख्या सामान्यांना हे तापमान सहन होत नाहीये, तर दुसरीकडे पाकिस्तानी सीमेवर आपले वीर जवान 53-55 अंश तापमानात कर्तव्य बजावत आहेत. सध्या राजस्थानच्या जैसलमेरमध्ये तापमान 55 अंशांवर पोहोचले आहे. अशा परिस्थितीतदेखील देशाच्या रक्षणासाठी चोवीस तास सीमेवर उभे आहेत.

राजस्थानमध्ये सध्या प्रचंड उष्णता आहे, संपूर्ण राज्य उष्णतेच्या लाटेने होरपळतोय. भारत-पाकिस्तानच्या पश्चिम सीमेवरील तापमानाने 55 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. अलीकडेच सीमेवरील जवानांचे काही व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यात भारतीय जवान तापलेल्या वाळूत पापड भाजताना, अंडी उकडताना आणि गाडीच्या बोनेटवर पोळी भाजताना दिसत आहेत. अश भीषण गरमीत सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) जवानांच्या हिंमतीपुढे सूर्यदेखील फिका पडल्याचे पाहायला मिळतेय. 55 अंश तापमानातदेखील जवान आपले काम चोख बजावत आहेत. 

या भीषण उन्हापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी जवान पूर्णवेळ डोक्यावर टोपी, चेहऱ्यावर रुमाल, डोळ्यावर गॉगल आणि सोबत लिंबू, कांद्यासह पाण्याची बाटली ठेवत आहेत. विशेष म्हणजे, अशा कडक उन्हात बीएसएफच्या महिला जवानदेखील देशासाठी आपले कर्तव्य चोख बजावत आहेत. 

शहरातील तापमान 50 च्या जवळसीमेवरील तापमान 55 च्या पुढे गेले आहे, तर राजस्तानमधील अनेक शहरातील तापमान 48-50 अंशांच्या जवळ पोहोचले आहे. राजस्थानच्या जैसलमेरमधील तापमान 48-50 डिग्री सेल्सियस, बरीटर 48, जॅलोर 47, जोधपूर 48, गंगानगर 47, कोटा 46,  भिलवाडा 45, फतेहपूरमध्ये 45 आणि जयपूरमधील तापमान 47 डिग्री सेल्सिअसवर पोहोचले आहे. उष्णता इतकी आहे की, ती 10 मिनिटे उन्हात थांबलो तरी, शरीर गरमीने वितळून जाईल, अशी परिस्थिती आहे. 

टॅग्स :BSFसीमा सुरक्षा दलIndiaभारतPakistanपाकिस्तानRajasthanराजस्थानIndian Armyभारतीय जवान