शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 20:42 IST

हिंदू पक्षाकडून दाखल करण्यात आलेल्या या याचिकेत, हे पूर्वी शिवमंदिर होते आणि आजही येथे मंदिराचे अवशेष विद्यमान आहेत. तसेच, दर्ग्याच्या घुमटात मंदिराच्या अवशेशांचा वापर करण्यात आला आहे, असा दावा हिंदू पक्षाकडून करण्यात आला आहे.

अजमेरच्या ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती दर्ग्यासंदर्भात हिंदू पक्षाने एक याचिका दाखल केली आहे. ही याचिका स्वीकारत, राजस्थानन्यायालयाने बुधवारी (27 नोव्हेंबर 2024) केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) यांना नोटीस बजावली आहे. यानंतर आता, न्यायालय 20 डिसेंबरला यासंदर्भात सुनावणी करणार आहे.

हिंदू पक्षाकडून दाखल करण्यात आलेल्या या याचिकेत, हे पूर्वी शिवमंदिर होते आणि आजही येथे मंदिराचे अवशेष विद्यमान आहेत. तसेच, दर्ग्याच्या घुमटात मंदिराच्या अवशेशांचा वापर करण्यात आला आहे, असा दावा हिंदू पक्षाकडून करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे, हा दर्गा प्रभू श्री संकटमोचन महादेव विराजमान मंदिर म्हणून घोषित करण्यात यावा आणि दर्गा समितीचा अनधिकृत कब्जा हटवण्यात यावा, असेही याचिका कर्त्याचे म्हणणे आहे. 13व्या शतकातील सूफी संत यांचा पांढरा मकबरा बांधण्यापूर्वी तेथे एक मंदिर होते, असा दावाही याचिकेत करण्यात आला आहे.

नेमके काय आहे याचिकेत? -- हिंदू पक्षाच्या वतीने तीन वकिलांनी यासंदर्भात न्यायालयात माहिती दिली आहे. अधिवक्ता योगेश सुरोलिया यांनी म्हटले आहे की, कायदेशीर टीमने न्यायालयात, माजी न्यायिक अधिकारी आणि शिक्षणतज्ज्ञ हर बिलास सरदार यांनी 1911 साली लिहिलेले, अजमेर: हिस्टोरिकल अँड डिस्क्रिप्टिव या पुस्तकाची प्रत सादर केली आहे. यात शिव मंदिराच्या अवशेषांचा उल्लेख आहे, ज्यावर दर्गा बांधण्यात आला. 

- दुसरे वकील राम स्वरूप बिश्नोई यांनी सांगितले की, मंदिर नष्ट होईपर्यंत तेथे पूजा आणि दैनंदिन विधी होत होते, हे न्यायालयाला सांगण्यात आले आहे. 

- तिसरे वकील विजय शर्मा यांनी याचिकाकर्त्याच्या दाव्याची खातरजमा करण्यासाठी एएसआय सर्वेक्षणाची मागणी केली आहे. ज्यात, दर्ग्याच्या घुमटात मंदिराचे अवशेष आजही विद्यमान आहेतत आणि तळघरात गर्भगृह असल्याचे पुरावेही आहेत, असा दावा याचिकाकर्त्याने केला आहे.  याशिवाय, वकिलाने म्हटले आहे की, 38 पानांच्या या याचिकेत अशी अनेक तथ्ये आहेत, ज्यावरून तेथे पूर्वीपासून एक शिव मंदिर अस्तित्वात होते, असे दिसते. ज्ञानवापी प्रकरणाप्रमाणेच हे प्रकरण फेटाळण्यासाठीही प्रार्थनास्थळ कायदा, 1991 लागू केला जाऊ शकत नाही.

टॅग्स :Rajasthanराजस्थानCourtन्यायालय