शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

अबब! उदयपूरच्या 'या' हॉटेलचे भाडे ऐकून थक्क व्हाल, एवढ्या पैशात चारचाकी खरेदी कराल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 21:54 IST

उदयपूरच्या या जगप्रसिद्ध लेक व्ह्यू हॉटेलमध्ये देश-विदेशातून पर्यटक राहायला येतात.

उदयपूर: नवीन वर्षानिमित्त लोक विविध ठिकाणी फिरायला जात आहेत. अशातच, जगभरात स्वतःची खास ओळख असलेल्या राजस्थानच्या उदयपूरमधील एका जगप्रसिद्ध हॉटेल्सचे भाडे नवीन वर्षाच्या निमित्ताने गगनाला भिडले आहे. उदयपूरच्या या सर्वात आलिशान हॉटेल एका दिवसाच्या भाड्यात तुम्ही टाटा नेक्सॉन/ह्युंदाई क्रेटासारखी गाडी घेऊ शकता. 

नवीन वर्षानिमित्ताने पर्यटक देशभरातील विविध पिकनिक स्पॉटवर फिरायला जात आहेत. यामुळे जवळपास सर्वच हॉटेल्सने आपले भाडे वाढवले आहे. अशातच, उदयपूरच्या हॉटेलचे दर 11 लाखांच्या आसपास पोहोचले आहे. आम्ही ज्या हॉटेलबद्दल बोलत आहोत, ते उदयपूर शहरातील ताज लेक पॅलेस हॉटेल आहे. हे हॉटेल उदयपूर शहरातील प्रसिद्ध पिचोला तलावाच्या मध्यभागी बांधले आहे. जगभरातील पर्यटक या हॉटेलमध्ये राहण्यासाठी येतात.

हा संगमरवरी लेक पॅलेस उदयपूरच्या महाराणी यांनी उदयपूर शहरातील लेक पिचोला येथे बांधला होता. सध्या हे ओबेरॉय ग्रुपकडे आहे. या हॉटेलमध्ये राहून तुम्हाला राजा-राणीसारखे वाटेल. येथे पुरवल्या जाणार्‍या सुविधाही आलिशान आहेत. या हॉटेलमधून उदयपूरच्या पिचोला तलावाचे सुंदर नजारे पाहता येतात. यासोबतच सिटी पॅलेस आणि शहरातील विविध घाटांचे दृश्यही येथून पाहता येते.

दिवसाचे भाडे 11 लाख रुपयेमिळालेल्या माहितीनुसार, या हॉटेलमधील रुम्सचे बुकिंग साधारणपणे 60 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंत असते. मात्र सध्या पर्यटन हंगाम असल्याने हॉटेल्सच्या भाड्यात सातत्याने वाढ होत आहे. उदयपूर शहरातील हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष राजेश अग्रवाल यांनी सांगितले की, पर्यटन हंगामामुळे दरवर्षी हॉटेलचे भाडे वाढत आहे. त्यामुळे शहरातील सर्वच हॉटेल्सच्या भाड्यात दिवसेंदिवस सातत्याने वाढ होत आहे. सध्या ताज लेक पॅलेसचे भाडे 11 लाख रुपयांच्या आसपास पोहोचले आहे. असे असूनही अनेक पर्यटक येथे राहणे पसंत करत आहेत.

टॅग्स :Rajasthanराजस्थानhotelहॉटेल31st December party31 डिसेंबर पार्टीtourismपर्यटन