शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

Dushyant Singh : वसुंधरा यांच्या मुलावर कोण-कोणत्या आमदारांना रिसॉर्टमध्ये ठेवल्याचा आरोप? वाचा सविस्तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 15:49 IST

या आरोपांनंतर राज्यात खळबळ उडाली. त्यामुळे प्रदेशाध्यक्षांना मैदानात यावे लागले आणि तसे काहीही नसल्याचे स्पष्ट करावे लागले. 

राजस्थानमधील राजकीय पेच काही संपताना दिसत नाही. मुख्यमंत्रिपदावरून सध्या राजकीय वातावरण तापले आहे. एकीकडे मुख्यमंत्री पदाचे सर्वच दावेदार आपापल्या परीने वातावरण तयार करत आहेत, तर दुसरीकडे भाजपने एकाही नावावर अद्याप निर्णय घेतला नाही. दरम्यान, गुरुवारी राजस्थानमध्ये एका भाजप आमदाराच्या वडिलांनी वसुंधरा राजे यांचा मुलगा दुष्यंत यांच्यावर पाच आमदारांना जबरदस्तीने एका रिसॉर्टमध्ये ठेवल्याचा आरोप केला. या आरोपांनंतर राज्यात खळबळ उडाली. त्यामुळे प्रदेशाध्यक्षांना मैदानात यावे लागले आणि तसे काहीही नसल्याचे स्पष्ट करावे लागले. 

दुसरीकडे, कोणत्याही किंमतीत पक्षाच्या विरोधात जाणार नाही, असे वसुंधरा राजे यांनीही म्हटले. तसेच, त्यांनी मुलावरील आरोपांबाबत स्पष्टीकरणही दिले. दरम्यान, वसुंधरा राजे यांचा मुलगा दुष्यंत सिंह यांच्यावर पाच आमदारांना बळजबरीने रिसॉर्टमध्ये ठेवल्याचा आरोप करणारे बाहेरच्या पक्षातील नाहीत. तर ते यापूर्वी भाजपचे आमदार राहिले आहेत. हेमराज मीणा असे त्यांचे नाव असून ते आमदार ललित मीणा यांचे वडील आहेत.

कोण पाच आमदार?1. कंवरलाल (अंता, बरण)कंवरलाल मीणा अंता विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. यावेळी त्यांनी काँग्रेसचे प्रमोद जैन यांचा पराभव केला आहे. 2018 मध्ये त्याचा पराभव झाला होता.

2. राधेश्याम बैरवा (बारां अटरू, बारा)राधेश्याम बैरवा हे व्यवसायाने ट्रेलर आहेत. यावेळी पक्षाने त्यांना तिकीट दिल्याने त्याची जोरदार चर्चा रंगली होती. सामान्य जीवन जगणारे बैरवा हे जिल्ह्याचे मंत्री आहेत आणि त्यांची पत्नी नगरसेवक आहे.

3. काळुराम मेघवाल (डग, झालावाड)अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या डग विधानसभेतून यंदाच्या निवडणुकीत भाजपचे काळूराम मेघवाल यांनी काँग्रेसचे चेतराज गेहलोत यांचा पराभव केला होता. 2018 मध्येही ते जिंकले होते.

4. गोविंद प्रसाद (मनोहर थाना, झालावाड)भाजपचे गोविंद प्रसाद यांनी मनोहर थाना विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार कैलाश चंद यांचा पराभव केला. गोविंद प्रसाद यांना 85304 मते मिळाली. तर अपक्ष उमेदवार कैलाश चंद यांना 60439 मते मिळाली. 2018 च्या निवडणूक लढतीत ही जागा भाजपचे उमेदवार गोविंद प्रसाद यांनी जिंकली होती.

5. ललित मीना (किशनगंज)ललित मीणा हे किशनगंजचे आमदार आहेत. ललित मीणा यांचे वडील हेमराज मीणा हे देखील आमदार राहिले होते. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या निर्मला सहारिया यांचा पराभव केला. ललित यांना 84155 मते मिळाली, तर काँग्रेसच्या निर्मला यांना 65868  मते मिळाली.

काय आहे आरोप?किशनगंजचे भाजप आमदार ललित मीणा यांचे वडील हेमराज मीणा यांनी आरोप केला आहे. "4 डिसेंबरला दुष्यंत यांनी वसुंधरा यांना भेटण्याच्या नावाखाली ललित यांना घेऊन गेले, पण भेटीनंतर त्यांना जयपूरच्या बाहेरील रिसॉर्टमध्ये ठेवले. वसुंधरा यांच्या भेटीनंतर ललित यांना पक्ष कार्यालयात जायचे होते, पण त्यांना तसे करण्यापासून रोखण्यात आले", असे हेमराज मीणा म्हणाले. तसेच, ललित यांना घेण्यासाठी रिसॉर्टमध्ये पोहोचलो पण काही लोकांनी मलाही अडवले. तेथे 5-10 लोक होते ज्यांनी सांगितले की ते मला आत जाऊ देणार नाहीत, परंतु माझ्यासोबत 10-15 लोक होते म्हणून मी माझ्या मुलाला परत आणण्यात यशस्वी झालो. झालावाड आणि बारण जिल्ह्यातील आणखी पाच आमदार देखील येथे होते, असेही हेमराज मीणा म्हणाले.

दरम्यान, या प्रकरणी कंवरलाल यांनी सांगितले की, दुष्यंत सिंह यांचे नाव खराब करण्याचा हा कट आहे. विजयानंतर आम्ही रॅली काढली आणि जयपूरला पोहोचलो. तिथल्या एका रिसॉर्टमध्ये थांबलो. उर्वरित आमदारांनीही आपल्या मर्जीने या रिसॉर्टमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता. 5 डिसेंबर रोजी रात्री अडीचच्या सुमारास 30-40 लोक रिसॉर्टमध्ये येऊन ललित यांच्याबद्दल विचारत होते. त्यामुळे मी त्यांना ओळखत नसल्याने आधी थांबवले. त्यानंतर ललित यांच्या वडिलांना पाहून मी त्यांना जाऊ दिले, असे कंवरलाल म्हणाले.

वसुंधरा यांनी काय स्पष्टीकरण दिले?आमदारांना जबरदस्तीने रिसॉर्टमध्ये ठेवल्याचा मुलगा दुष्यंत सिंह यांच्यावरील आरोपांवर वसुंधरा राजे म्हणतात की, असे आरोप करून त्यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे आरोप निराधार आहेत.

टॅग्स :Rajasthanराजस्थानRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकElectionनिवडणूकBJPभाजपा