शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा कोरोना पॉझिटिव्ह, ट्विटद्वारे दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 16:15 IST

CM Bhajan Lal Sharma Corona Positive : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरून भजनलाल शर्मा यांनी यासंदर्भात  माहिती दिली आहे. 

CM Bhajan Lal Sharma Corona Positive : (Marathi News) राजस्थानचे (Rajasthan) मुख्यमंत्री भजनलाल शर्मा  (Bhajan Lal Sharma) यांना कोरोना व्हायरसची (Corona Virus) लागण झाली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरून भजनलाल शर्मा यांनी यासंदर्भात  माहिती दिली आहे. 

आरोग्याच्या समस्येमुळे आज माझी आरोग्य तपासणी केली. त्यानंतर माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, असे भजनलाल शर्मा यांनी म्हटले आहे. पुढे भजनलाल शर्मा म्हणाले, " "मी सेल्फ-आयसोलेशनमध्ये आहे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे पूर्णपणे पालन करत आहे. आगामी सर्व कार्यक्रमांमध्ये व्हर्च्युअल माध्यमातून सहभागी होणार आहे."

दरम्यान, माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना जेव्हा मुख्यमंत्री भजनलाल शर्मा कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी समजली, तेव्हा त्यांनी त्यांच्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्विट केले आहे. अशोक गेहलोत म्हणाले, "मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांना कोविड पॉझिटिव्ह झाल्याची माहिती मिळाली. मी त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देतो."

कार्यक्रमात व्हर्च्युअल माध्यमातून सहभागीकोरोना पॉझिटिव्ह असल्याने मुख्यमंत्री भजनलाल शर्मा कृषी संशोधन केंद्र दुर्गापुरा येथे आयोजित शक्ती वंदन अभियानाच्या समारोप कार्यक्रमात व्हर्च्युअल माध्यमातून सहभागी झाले होते. यासोबतच मुख्यमंत्र्यांनी उपस्थित महिला शक्तीला अक्षरश: संबोधित केले. दरम्यान, पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शक्ती वंदन कार्यक्रमाला संबोधित केले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRajasthanराजस्थान