शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थान विधानसभा निवडणुकीची तारीख बदलली, आता 'या' दिवशी होणार मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 16:58 IST

निवडणूक आयोगाने राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीच्या तारखेत बदल केला आहे.

जयपूर : राजस्थान विधानसभा निवडणुकीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. निवडणूक आयोगाने राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीच्या तारखेत बदल केला आहे. आता राजस्थानमध्ये २३ नोव्हेंबर ऐवजी २५ नोव्हेंबरला मतदान होणार आहे.

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने राजस्थानसह पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या होत्या. राजस्थानमध्ये एका टप्प्यातील मतदानाची तारीख २३ नोव्हेंबर निश्चित करण्यात आली होती. परंतु, तारीख जाहीर झाल्यानंतर विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि विविध माध्यमांनी निवडणुकीच्या तारखेबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आपली मते मांडली होती. 

२३ नोव्हेंबरला राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणावर लग्नसमारंभ असणार आहेत. अशा परिस्थितीत लोकांची गैरसोय होणार आहे. वाहनांची कमतरता भासणार असून अशा स्थितीत मतदानावरही परिणाम होऊ शकतो, असे त्यावेळी सांगण्यात आले होते. यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने विचार करून आता मतदानाची तारीख बदलून २३ नोव्हेंबर ऐवजी २५ नोव्हेंबर केली आहे.

दोन दिवसांपूर्वी राजस्थानसह मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून करण्यात आली होती.  या ५ राज्यांच्या नोव्हेंबर २०२३ मध्ये निवडणुका होणार आहेत. मिझोराममध्ये ७ नोव्हेंबरला मतदान होईल. छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात मतदान होईल. पहिल्या टप्प्यातील मतदान ७ नोव्हेंबरला, दुसऱ्या टप्प्यातील १७ नोव्हेंबरला मतदान होईल. तर तेलंगाणात ३० नोव्हेंबरला मतदान होईल. मध्य प्रदेशमध्ये मतदान १७ नोव्हेंबरला होणार आहे. सर्व राज्यांचे निवडणुकीचे निकाल ३ डिसेंबरला लागतील. 

दरम्यान, राजस्थान आणि छत्तीसगड या दोन मोठ्या राज्यांमध्ये सत्तेत असलेल्या काँग्रेससाठी ही निवडणूक अग्निपरीक्षा असेल. भाजपसाठी या निवडणुकीत बरेच काही पणाला लागले आहे, कारण लोकसभा निवडणुकीवर त्याचा परिणाम निश्चित होणार आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजप व काँग्रेसमध्ये थेट लढत होणार असून, तेलंगणामध्ये बीआरएस, काँग्रेस आणि भाजपमध्ये तर मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रंट विरुद्ध काँग्रेस अशी टक्कर असणार आहे.

टॅग्स :Rajasthanराजस्थानRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूक