शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

शारजाला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, प्रवाशाला आला हृदयविकाराचा झटका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2023 08:45 IST

विमानाच्या क्रू मेंबरने लगेच जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाला माहिती दिली आणि इमर्जन्सी लँडिंगची परवानगी मागितली.

जयपूर : राजस्थानची राजधानी जयपूर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरइंडिगोच्याविमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. इंडिगोचे हे विमान उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथून उड्डाण केल्यानंतर शारजाला जात होते. विमान उड्डाण करत असताना विमानातील क्रू मेंबरला एका प्रवाशाला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळाली. त्यामुळे काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. विमानाच्या क्रू मेंबरने लगेच जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाला माहिती दिली आणि इमर्जन्सी लँडिंगची परवानगी मागितली. त्यानंतर जयपूर विमानतळ एटीसीच्या अधिकाऱ्यांची तात्काळ शारजाहला जाणाऱ्या या विमानाला इमर्जन्सी लँडिंगची परवानगी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगोच्या विमानाने (फ्लाइट क्रमांक 6E-1423) उत्तर प्रदेशची राजधानी लखनौहून रविवारी रात्री 9.45 वाजता शारजाहला उड्डाण केले होते. विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला हृदयविकाराचा झटका आला. यासंबंधी माहिती क्रू मेंबरने लगेच जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ एअर ट्रॅफिक कंट्रोलला दिली. तसेच, इमर्जन्सी लँडिंगची परवानगी मागितली. यानंतर परवानगी मिळताच इंडिगोचे विमान जयपूर विमानतळावर उतरवण्यात आले. यानंतर प्रवाशाला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

याआधी मे महिन्यातही जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर चार विमानांचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते. दिल्लीतील खराब हवामानामुळे विमानांचे जयपूर विमानतळावर लँडिंग करावे लागले होते. इंदूरहून दिल्लीला येणारे इंडिगो 6E-2174 विना जयपूर विमानतळाकडे डायव्हर्ट करण्यात आले होते. याशिवाय राजकोट-दिल्ली आणि झारसुगुडा-दिल्ली विमानेही जयपूर विमानतळावर उतरवण्यात आली होती. इमर्जन्सी लँडिंगपूर्वी जयपूर विमानतळ अधिकाऱ्यांनी यासंबंधी माहिती देण्यात आली होती, जेणेकरून विमानांच्या आपत्कालीन लँडिंगसाठी विमानतळ तयार ठेवले जाईल.

... तर तुम्ही विमानाचे तिकीट बुक करू शकतादरम्यान, सध्या सणासुदीचा काळ सुरू झाला आहे. रक्षाबंधनाचा सण जवळ येत आहे. या दिवशी सार्वजनिक वाहतुकीवर सर्वाधिक भार असतो. राजस्थानमध्ये या दिवशी सर्वाधिक प्रवासी रोडवेज बसमधून प्रवास करतात. यावेळी रस्त्यांची अवस्था बिकट असून रेल्वेतही पुरेशी व्यवस्था नसल्याने यंदा रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर विमान कंपन्यांनी भाडेवाढ केलेली नाही. 28 ऑगस्टपर्यंत, राखीच्या एक दिवस आधी, सर्व विमान कंपन्या फक्त नियमित भाडे आकारत आहेत. जर तुम्हालाही रक्षाबंधनाच्या दिवशी राज्याबाहेर जायचे असेल आणि तुम्हाला रेल्वेमध्ये रिझर्व्हेशन मिळत नसेल तर तुम्ही विमानाचे तिकीट बुक करू शकता.

टॅग्स :Indigoइंडिगोairplaneविमान