शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
4
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
5
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
6
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
7
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
8
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
9
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
10
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
11
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
12
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
13
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
14
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
15
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
16
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
17
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
18
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
19
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
20
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!

राजस्थानमध्ये पाच ‘गुरू’ उतरले रिंगणात, कोणाचे पारडे अधिक जड?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 06:06 IST

ओटाराम देवासी, प्रतापपुरी यांच्यासाठी परीक्षा सोपी, तर तिघांना द्यावी लागतेय ‘कांटे की टक्कर’

लोकमत न्यूज नेटवर्कजयपूर: राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार आता चांगलाच जोर धरत आहे. कॉंग्रेस आणि भाजपमध्ये प्रमुख लढत असलेल्या राजस्थानमध्ये ध्रुवीकरणाचा विषयही चर्चेत आला आहे. भाजपने ४, तर काॅंग्रेसने एका धर्मगुरुला रिंगणात उतरविले असून त्यापैकी दोघांसाठी निवडणुकीचा पेपर सोपा, तर तिघांसाठी कठीण असल्याचे म्हटले जात आहे. 

देवासींना संधीसिरोही मतदारसंघात भाजपने रेबारी समाजाचे संत ओटाराम देवासी यांना तिकीट दिले असून कॉंग्रेसकडून विद्यमान आमदार संयम लोढा रिंगणात आहे. मतदारंसघात भाजपकडून बंडखोर उमेदवार असला, तरी अँटी-इन्कम्बंसीमुळे कॉंग्रेसबाबत नाराजीचे वातावरण आहे. 

यांना पेपर कठीण भाजपने तिजारा मतदारसंघात खासदार बाबा बालकनाथ यांनी रिंगणात उतरविले आहे. कॉंग्रेसकडून त्यांच्याविरोधात इमरान खान लढत आहे. मतदारसंघात यादव, गुर्जर तसेच एससी मतदारांची अधिक संख्या असून बालकनाथ यांच्यासाठी ही लढत सोपी नसणार आहे.

सहानुभूतीचा फायदा भाजपने पोखरण मतदारसंघात महंत प्रतापपुरी यांना, तर कॉंग्रेसने मुस्लिम धर्मगुरू सालेह मोहम्मद यांनी तिकीट दिले आहे. यंदा सालेह यांच्याबाबत काही प्रमाणात नाराजीचे वातावरण आहे, तर प्रतापपुरी यांच्याबाबत सहानुभूती आहे. एससी मतदारांवर निकाल अवलंबून आहे.

काटेरी लढत भाजपने हवामहलमध्ये हाथोज धामचे धर्मगुरू बालमुकुंदाचार्च यांना तिकिट दिले. त्यांच्याविरोधात कॉंग्रेसकडून महेश जोशी रिंगणात आहे.सुरुवातीला कॉंग्रेस नेत्याने बंडखोरी केल्याने बालमुकुंदाचार्य यांना ही लढत सोपी झाली होती. मात्र, बंडखोराने अर्ज मागे घेतल्याने चित्र बदलले आहे.

टॅग्स :Rajasthanराजस्थानRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकBJPभाजपा