शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

राजस्थानमध्येही आणा डबल इंजिन सरकार, एकनाथ शिंदेंची सभा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 06:07 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मतदारांना आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कजयपूर : महाराष्ट्राप्रमाणे राजस्थानमध्येही डबल इंजिन सरकार आणण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील मतदारांना केले. या निवडणुकीत मतदार भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना कौल देऊन राजस्थानमध्ये नक्की परिवर्तन घडवतील, असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. 

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा प्रचार रंगात आलेला असताना गुरूवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजस्थानमध्ये जाऊन  भाजपच्या उमेदवारांचा प्रचार केला. सकाळी जयपूर विमानतळावर दाखल होताच त्यांचे पारंपरिक राजस्थानी पद्धतीने पगडी घालून स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी सगळ्यात आधी जयपूरच्या हवा महल परिसरातून निवडणुकीला उभे असलेले योगी श्री बालमुकुंद आचार्य यांच्यासाठी प्रचारफेरी काढली. राजस्थान ही महाशूरवीर महाराणा प्रताप यांची पुण्यभूमी असून, मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातून आलो आहे, असे सांगताना त्यांनी देशासह राज्याला प्रगतीपथावर न्यायचे असेल तर केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे एकाच पक्षाचे आणि विचारांचे सरकार असणे गरजेचे असते. महाराष्ट्रात डबल इंजिनचे सरकार अस्तित्वात आल्याने देशात सर्वाधिक विकास प्रकल्प हे महाराष्ट्रात सुरू आहेत.  त्यांनी शहापुरातील भाजप उमेदवार उपेन यादव. कोठपुतलीतील उमेदवार हंसराज पटेल यांच्यासाठी प्रचारसभा घेतल्या.

राजेंद्र सिंह गुढा यांची मैत्रीपूर्ण लढत 

झुंझुनू जिल्ह्यातील उदयपूरवाटी विधानसभा मतदार संघातील शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवत असलेले राजेंद्र सिंह गुढा हेदेखील या निवडणुकीत नक्की विजयी होतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. या  मतदार संघातील लढत ही मैत्रीपूर्ण असून, तिथे कोणताही निकाल लागला तरीही एनडीएचे हात बळकट करण्याच्या भूमिकेवर शिवसेना ठाम राहील, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. गुढा यांच्या प्रचारासाठी उद्योगमंत्री उदय सामंत आणि शिवसेना  सचिव कॅप्टन अभिजीत अडसूळ यांनी प्रचार केला असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा