शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

राजस्थानमध्ये राजकीय हालचालींना वेग, १७ नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 17:06 IST

राजस्थान भाजपचे प्रभारी अरुण सिंह, प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी आणि विरोधी पक्षनेते राजेंद्र राठोड यांच्या उपस्थित या सर्व नेते पक्षात सामील झाले. 

जयपूर : राजस्थानमध्ये सर्वांनाच आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांकडून जोरात सुरू झाली आहे. दरम्यान, राजस्थानमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. येथील विविध पक्षांच्या अशा जळपास १७ नेत्यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राजस्थान भाजपचे प्रभारी अरुण सिंह, प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी आणि विरोधी पक्षनेते राजेंद्र राठोड यांच्या उपस्थित या सर्व नेते पक्षात सामील झाले. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी म्हणाले की, सर्वांनी पक्षात बिनशर्त प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयासाठी सर्वांनीच संकल्प केला आहे. राजधानी जयपूर येथील भाजपच्या मुख्यालयात या सर्व १७ नेत्यांना पक्षात प्रवेश केला. यामध्ये माजी आयपीएस जसवंत संपतराम, लल्लुराम बैरवा, केआर मेघवाल, डॉ. शिवचरण कुशवाह, रवींद्र सिंह बोहरा, पवन दुग्गल, विवेक सिंह बोहरा, राणी दुग्गल, माजी आयएएस डॉ. एसपी सिंह आणि मनोज शर्मा, ममता कंवर, डीडी कुमावत, धनसिंग रावत, दिनेश रंगा आणि गीता वर्मा यांचा समावेश आहे.

अरुण सिंह यांचा दावा- भाजप प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करेलराजस्थान भाजपचा परिवार आणखी वाढला आहे, असे राज्याचे प्रभारी अरुण सिंह म्हणाले. तसेच, राजस्थानमध्ये भाजपची लाट आहे. भाजप प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करेल, असा दावा अरुण सिंह यांनी केला. याशिवाय, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सत्य बोलल्याबद्दल आपल्या मंत्र्याला बडतर्फ केल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, राजस्थानमध्ये हाहाकार माजल्याची स्थिती आहे. सगळीकडे अनागोंदी कारभार आहे. त्यामुळे इतके कमी काँग्रेसचे आमदार येतील की ते फॉर्च्युनरमध्ये बसून जातील, असेही अरुण सिंह म्हणाले.

तिवारी आणि महारिया यांचीही झालीय 'घरवापसी'विशेष म्हणजे, गेल्या काही वर्षापूर्वी माजी केंद्रीय मंत्री सुभाष महारिया भाजपमध्ये परतले होते. गेल्या लोकसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने नाराज होऊन सुभाष महारिया यांनी पक्ष सोडला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तसेच, त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. पण पराभूत झाले. दुसरीकडे, गेल्या विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री घनश्याम तिवारी यांनीही भाजपला सोडचिठ्ठी देत ​​आपला नवा पक्ष स्थापन केला होता. पण त्या पक्षाला यश आले नाही. त्यानंतर तिवारी काँग्रेसमध्ये गेले. पण नंतर ते भाजपमध्ये आले. आता पक्षाने घनश्याम तिवारी यांना राजस्थानमधून खासदार म्हणून राज्यसभेवर पाठवले आहे.

टॅग्स :Rajasthanराजस्थानBJPभाजपा