आषाणे धबधब्यात युवकाचा मृत्यू

By Admin | Updated: June 18, 2017 00:54 IST2017-06-18T00:54:31+5:302017-06-18T00:54:31+5:30

कर्जत तालुक्यातील आषाणे धबधब्यावर सहलीसाठी गेलेला कल्याण येथील रॉबिन साबू मिळमुडी (१७) हा पाय घसरून पडल्याने त्याचा मृत्यू झाला.

Youth's death in Asha Falls | आषाणे धबधब्यात युवकाचा मृत्यू

आषाणे धबधब्यात युवकाचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
नेरळ : कर्जत तालुक्यातील आषाणे धबधब्यावर सहलीसाठी गेलेला कल्याण येथील रॉबिन साबू मिळमुडी (१७) हा पाय घसरून पडल्याने त्याचा मृत्यू झाला.
रॉबिन साबू मिळमुडी याने नुकताच उल्हासनगर येथील आर. के. टी. महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. गुरु वारी तो आणि त्याचा मित्र मोहित सुनील दुधानी (१७, रा. डोंबिवली) या दोघांनी कॉलेजमध्ये गेल्यावर, फिरायला कर्जतमधील आषाणे धबधब्यावर जायचे ठरविले. दुपारी भिवपुरी स्थानकात आल्यानंतर, त्यांनी आषाणे धबधबा गाठला.
फारसा पाऊस नसल्याने धबधब्यावर पाणी नव्हते. मात्र, परिसरात ओलावा निर्माण झाला होता. ते दोघे धबधब्याच्या टोकावर गेले असता, रॉबिनचा तोल गेल्याने तो उंचावरून खाली कोसळला आणि गंभीर जखमी झाला. दोन तासांनंतर ग्रामस्थांना याबाबत समजल्यावर, त्यांनी त्याला खासगी रु ग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Web Title: Youth's death in Asha Falls