शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनदी संवर्धनासाठी तरुणांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 23:34 IST

उल्हासनदी बचाव मोहीम; पात्रातील जलपर्णी काढण्याचे काम सुरू

- कांता हाबळे नेरळ : नेरळ, कर्जत परिसरातील तरुणांनी उल्हासनदी बचाव ही मोहीम हाती घेतली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून गेल्या दीड महिन्यापासून याबाबत नियोजन सुरू असून, काही भागातील तरु णांनी पुढाकार घेऊन अनेक ठिकाणी नदीपात्रात वाहत आलेली आणि साठलेली जलपर्णी काढण्याचे काम हाती घेतले आहे, त्यामुळे काही भागात नदीपात्र स्वच्छ झाल्याचे दिसत आहेत. तरु णांनी सुरू केलेल्या या नदीपात्र संवर्धनामुळे तरुणांचे सर्वत्र कौतुक होत आहे.कर्जत, नेरळ भागातून वाहणाऱ्या उल्हासनदीचा उगम लोणावळा भागातील राजमाची परिसरात होत असून, येथील डोंगराळ भागातून वाहणारे पाणी येथून उल्हासनदीला येऊन मिळते. पुढे या नदीचे पात्र मोठे मोठे होत आहे. या उल्हासनदीत परिसरातील काही भागात सुरू असलेले नवीन बांधकामे तसेच शहरातील मोठ्या प्रमाणात सांडपाणी नदीत सोडले जात असल्याने ही नदी जलपर्णीच्या विळख्यात सापडली आहे. ही जलपर्णी गेल्या दोन महिन्यांपासून उल्हास नदीपात्रात वाहत येत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना दूषित पाण्याचा सामना करावा लागत आहे; परंतु याकडे ना प्रशासनाचे लक्ष, ना लोकप्रतिनिधींचे. दोन महिन्यांपासून अनेक भागातील नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. नदीच्या पाण्यावर अनेक पाणी योजना अवलंबून आहेत; परंतु अनेक पाणी योजनांना फिल्टर प्लँट नसल्याने हे दूषित पाणी घराघरांत जात असल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे.लोकसभा निवडणुकीचा माहोल असल्याने अनेक आदिवासी भागात, शहरी भागात नेत्यांकडून आश्वासनांची खैरात सुरू आहे. ही आश्वासने फक्त निवडणुकीपुरतीच असतात. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून उल्हासनदीच्या काठावर असलेल्या गावांना दूषित पाणी प्यावे लागत आहे, याकडे कुणाचे लक्ष नाही. यासाठी नेरळ परिसरातील तरु णांनी पुढाकार घेतला असून, उल्हासनदी वाचविण्यासाठी नियोजन केले आहे, त्यानुसार काही भागात नदीपात्र स्वच्छ करण्याचे काम सुरू आहे. वेळ मिळेल तसे तरु ण नदी स्वच्छ करण्याचे काम करत आहेत. तसे नियोजनही त्यांनी केले आहे.दूषित पात्र स्वच्छ करण्याचे आवाहननेरळ, कर्जत परिसरातील तरु णांनी अनेक भागात जाऊन साठलेल्या जलपर्णी असलेल्या भागाची पाहणी केली व त्यानुसार ही जलपर्णी काढण्याचे काम सुरू केले आहे. लोकांना स्वच्छ पाणी मिळावे, या हेतूने या मोहिमेस सुरु वात करण्यात आली असून ज्या ज्या गावाजवळ असलेल्या नदीपात्रात जलपर्णी, प्लॅस्टिक नदीपात्रात साचले असल्यास तरु णांनी पुढाकार घेऊन दूषित पात्र स्वच्छ करावे, असे आवाहनही उल्हासनदी बचाव मोहीम ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.गेल्या दोन महिन्यांपासून कर्जत, नेरळ परिसरातील उल्हास नदीपात्रात जलपर्णी वाहत येत असल्याने परिसरातील ग्रामस्थांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. यावर नियोजन करण्यासाठी व्हाट्सअ‍ॅप ग्रुप तयार करण्यात आला असून, नदी स्वच्छ करण्यासाठी नियोजन सुरू केले असून त्यानुसार काम सुरू आहे. दहिवली व काही भागात नदीपात्र स्वच्छ करण्यात आले असून पुढे ही मोहीम अशीच सुरू राहणार आहे. यासाठी परिसरातील अनेक तरु णांनी या मोहिमेत सहभागी व्हावे.- केशव तरे, ग्रामस्थ, कोदिवले

टॅग्स :riverनदीpollutionप्रदूषण