हॉटेल ट्रॉपिकाना येथे तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू

By निखिल म्हात्रे | Updated: November 6, 2023 17:50 IST2023-11-06T17:49:01+5:302023-11-06T17:50:03+5:30

कामगाराचा मृत्यू हॉटेलच्या हलगर्जीपणामुळे झाला असल्याचा स्थानिक ग्रामस्थांचा आरोप आहे

Youth dies of electric shock at Hotel Tropicana | हॉटेल ट्रॉपिकाना येथे तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू

हॉटेल ट्रॉपिकाना येथे तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू

अलिबाग - तालुक्यातील मुशेत येथील पंचतारांकित हॉटेल ट्रॉपीकाना मध्ये दुपारच्या साडे अकराच्या सुमारास फिल्टर पाण्याची टाकी साफसफाई करतेवेळी विजेच्या धक्क्याने मुशेत येथील स्थानिक तरुण प्रणय विजय जरंडे (20) या कामगाराचा मृत्यू झाला आहे.

सदर कामगाराचा मृत्यू हॉटेलच्या हलगर्जीपणामुळे झाला असल्याचा स्थानिक ग्रामस्थांचा आरोप आहे, याबाबत हॉटेल व्यवस्थापन चर्चेस सहकार्य करत नसल्याने ग्रामस्थांचा एकत्र जमाव जमल्यामुळे तणाव निर्माण झाला आहे. यावेळी घटनास्थळी मांडवा पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास मांडवा पोलीस अधिकारी करत आहेत.

Web Title: Youth dies of electric shock at Hotel Tropicana