शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
3
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
4
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
5
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
6
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
7
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
8
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
9
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
10
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
11
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
13
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
14
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
15
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
16
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
17
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
18
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
19
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
20
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

रायगडमध्ये युवा मतदार ठरणार निर्णायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2019 3:31 AM

३५ हजार ४५२ नवमतदार : एकूण लोकसंख्या ३१ लाख ७३ हजार ३५८

जयंत धुळप अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघातील एकूण लोकसंख्या ३१ लाख ७३ हजार ३५८ असून त्यातील १८ वर्षांवरील लोकसंख्या २२ लाख ५४ हजार २२२ आहे, त्याची टक्केवारी७१.०३ आहे. तर २२ लाख २५९ नोंदणीकृत मतदार असून यामध्ये १८ ते ३९ वयोगटातील तरुणांची संख्या १ लाख १२ हजार ७५३ आहे. त्यापैकी ३१.४४ टक्के म्हणजे तब्बल ३५ हजार ४५२ जणांची जिल्हा निवडणूक यंत्रणेच्या नवमतदार नोंदणी अभियानातून नोंद झाली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ते प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत.मतदान हक्क प्राप्त १८ ते ८०(व अधिक) वयोगटातील मतदारांच्या सरकारकडून अपेक्षा वयोगट परत्वे वेगवेगळ््या असतात आणि वयपरत्वे वयोगट सर्वसाधारणपणे १८ ते ३९, ४० ते ५९ आणि ६० ते ८०(व अधिक) असे मानले जातात.

विशेषत: शासकीय योजना निर्मितीच्या वेळी अशा स्वरूपाचा वयोगट गृहीत धरला जातो. या पार्श्वभूमीवर रायगड लोकसभा मतदार संघातील १८ वर्षावरील लोकसंख्या एकूण २२ लाख ५४ हजार २२२ असून त्यातील २२ लाख २५९ मतदान हक्क प्राप्त नोंदणीकृत अधिकृत मतदारांमध्ये सर्वाधिक ५ लाख १० हजार ३७० मतदार हे ३० ते ३९ या वयोगटातील आहेत. त्यावरील म्हणजे २० ते २९ या वयोगटातील मतदार ४ लाख २६ हजार १४० आहेत. परिणामी रायगड लोकसभा मतदार संघात १८ ते ३९ या वयोगटातील मतदान हक्क प्राप्त मतदारांची एकूण संख्या ९ लाख ७१ हजार ९६२ आहे.वयपरत्वे दुसऱ्या टप्प्यातीलच्४० ते ४९ वयोगटातील मतदार संख्या ४ लाख ३८ हजार ५९३ आहे तर ५० ते ५९ वयोगटातील मतदार संख्या ३ लाख ६० हजार ९८९ आहे. परिणामी ४० ते ५९ वयोगटातील एकूण मतदार संख्या ७ लाख ९९ हजार ५८२ आहे.वयपरत्वे तिसऱ्या टप्प्यातीलच्६० ते ८०(व अधिक)या वयोगटात ६० ते ६९ वयोगटात २ लाख ३१ हजार ३४२, ७० ते ७९ वयोगटात १ लाख २६ हजार ९६४ तर ८० व अधिक या वयोगटात ७० हजार ४०९ असे एकूण ४ लाख २८ हजार ७१५ मतदार आहेत. 

टॅग्स :Raigadरायगडraigad-pcरायगडVotingमतदान