तंटामुक्त अध्यक्षपदी महिला

By Admin | Updated: August 27, 2015 01:00 IST2015-08-27T01:00:01+5:302015-08-27T01:00:01+5:30

महाड तालुक्यातील दासगाव येथील १५ आॅगस्टची तहकूब ग्रामसभा मंगळवारी पार पडली. वारंवार पुरुषच अध्यक्षपद घेत आहेत. महिलांना कधी संधी मिळणार, महिला तंटे मिटविण्यास

Women elected as non-controversial president | तंटामुक्त अध्यक्षपदी महिला

तंटामुक्त अध्यक्षपदी महिला

दासगाव : महाड तालुक्यातील दासगाव येथील १५ आॅगस्टची तहकूब ग्रामसभा मंगळवारी पार पडली. वारंवार पुरुषच अध्यक्षपद घेत आहेत. महिलांना कधी संधी मिळणार, महिला तंटे मिटविण्यास कधी सक्षम होणार या दृष्टिकोनातून तंटामुक्त अध्यक्षपद महिलेला देण्याचे ठरवत गावातील पंचायत समिती सदस्यपद महिला विनीता चांढवेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
२००७ साली तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी गावागावात लोकांमध्ये बंधुभाव निर्माण होवून लोकांमध्ये सलोखा कायम राहावा, त्याचबरोबर छोट्या मोठ्या गोष्टीसाठी गोरगरीब लोकांना कोर्टकचेऱ्याचा फेऱ्या माराव्या न लागाव्यात तसेच छोटे - मोठे तंटे गावपातळीवरच मिटवण्यात यावेत यासाठी २००७ साली तंटामुक्त कायदा महाराष्ट्रात अमलात आणला. त्याबरोबर गावोगावी तंटामुक्त कमिट्यांची स्थापना झाली. मात्र कमिटी तयार करण्यासाठी वारंवार यामध्ये आजतागायत राजकारण होत असल्याचे पहावयास मिळत आहे. दासगाव या गावची लोकसंख्या पाच हजार आहे. या ठिकाणी आतापर्यंत पुरुष हेच अध्यक्षपद घेत होते. १५ आॅगस्टची तहकूब ग्रामसभा ही सोमवारी पार पडली. या सभेमध्ये जवळपास १०० हून अधिक नागरिकांनी भाग घेतला होता. महत्त्वाचे म्हणजे या सभेमध्ये महिलांची संख्या कमी होती. आपल्या गावामध्ये अद्याप महिलांना अध्यक्षपद मिळालेले नाही. महिला तंटे मिटविण्यास कशा पद्धतीने सक्षम होतील. महिलांचे मत महिलांच जाणू शकतात या दृष्टिकोनातून पुढील पाच वर्षांचा तंटामुक्त अध्यक्षपदाचा मान महिलेला देण्याचे ठरवत विनीता चांढवेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. विनीता चांढवेकर या महाड पंचायत समिती सदस्या आहेत. (वार्ताहर)

विश्वासाला तडा जावू देणार नाही
गावातील नागरिकांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला मी तडा जावू देणार नाही.गावातील समस्या, काही भांडणे असतील ही सर्व गावपातळीवरच मिटवून घेईल, कोणत्याही तऱ्हेचा नागरिकांना त्रास होवून देणार नाही, अशी भावना विनीता चांढवेकर यांनी व्यक्त केली.
महाड शहर पोलीस ठाणे हद्दीत तंटामुक्त कमिटीमध्ये २८ गावांचा समावेश आहे. मात्र या सर्व गावांमध्ये अद्याप महिलांना अध्यक्षपदाचा मान मिळाला नसून दासगांव हे पहिले गाव आहे. त्यांनी महिलांची कदर केली आहे. त्यामुळे सर्वत्र स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे. महिला तंटे मिटविण्यास कधी सक्षम होणार या दृष्टिकोनातून तंटामुक्त अध्यक्षपदी पंचायत समिती सदस्यपदी विनीता चांढवेकर यांची निवड केली आहे.

Web Title: Women elected as non-controversial president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.