चौकजवळ महिलेचा गळा आवळून खून
By Admin | Updated: December 23, 2016 03:24 IST2016-12-23T03:24:39+5:302016-12-23T03:24:39+5:30
चौकनजीक पंचवीस वर्षीय अनोळखी महिलेचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली. या महिलेवर बलात्कार करून नंतर

चौकजवळ महिलेचा गळा आवळून खून
मोहोपाडा : चौकनजीक पंचवीस वर्षीय अनोळखी महिलेचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली. या महिलेवर बलात्कार करून नंतर तिचा खून करण्यात आल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.
चौक पोलीस मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्ग चारवरून विणेगाव हद्दीतील बापदेवकडून चौक गावाच्या दिशेने पेट्रोलिंगकरिता निघाले असताना चौक फाट्यानजीक आर्य मरीन अॅकॅडमीच्या पुढे वीटभट्टीजवळ एक महिला पडलेली दिसली. यावेळी स.पो.निरीक्षक खरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. महिलेचा तिच्याच ओढणीने गळा आवळून खून झाल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले असून महिलेची ओळख पटेल अशी एकही वस्तू जवळपास सापडली नाही. महिलेचा खून करण्यापूर्वी तिच्यावर अतिप्रसंग झाल्याची दाट शक्यता असून शवविच्छेदन अहवालानंतर सत्य समजेल असे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेवून चौक येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता पाठविला असून अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार एम.पी.खरे यांच्या मार्गदर्शखाली सुरू आहे. (वार्ताहर)