मांत्रिकाने केला महिलेवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 03:08 IST2018-03-31T03:08:45+5:302018-03-31T03:08:45+5:30

घरातील नड काढण्यासाठी जादूटोणा करण्याच्या बहाण्याने मांत्रिकाने एका महिलेवर बलात्कार केल्याची

Woman raped by mother-in-law | मांत्रिकाने केला महिलेवर बलात्कार

मांत्रिकाने केला महिलेवर बलात्कार

महाड : घरातील नड काढण्यासाठी जादूटोणा करण्याच्या बहाण्याने मांत्रिकाने एका महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना महाड तालुक्यातील ढालकाठी येथे घडली. या प्रकरणी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिला (४५, मूळ भोर) महाड तालुक्यातील रहिवासी असून, सध्या पतीसह ढालकाठी येथे राहते. पतीवर असलेले कर्ज फिटत नसल्याने ही महिला मंडणगड (जि. रत्नागिरी ) तालुक्यातील विणे या गावातील गोविंद कोंडाळकर या मांत्रिकाकडे गेली होती. या वेळी कोंडाळकरने घरात नड आहे ती काढावी लागेल,असे सांगितले. ही नड काढण्यासाठी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात कोंडाळकर ढालकाठी येथील पीडितेच्या घरी आला. तांत्रिक विधी करताना नवरा घरात नको, असे सांगून त्याने महिलेच्या नवऱ्याला घरातून बाहेर जायला सांगितले. आणि विधी करण्याचा बहाण्याने महिलेवर बलात्कार केला.
महिनाभरानंतर महिलेने महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट प्रथा, अघोरी प्रथा, जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटनच्या कलमांतर्गत कोंडाळकरवर गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Woman raped by mother-in-law