शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अलिबागमध्ये प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू; नातेवाइकांचा रुग्णालयाविरोधात संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 05:59 IST

उपचारात निष्काळजीपणा केल्याचा आरोप: घोटवडे येथील सुचिता थळे (२९) हिला प्रसूती वेदना  सुरू झाल्यानंतर डॉ. अनिल फुटाणे यांच्या रुग्णालयात सोमवारी दाखल केले होते.

अलिबाग : लाडक्या मुलीला मुलगा झाला म्हणून आई, वडिलांसह कुटुंबीय आनंदित होते. मात्र, त्यांचा आनंद जास्त काळ टिकला नाही. या महिलेची तब्येत खालावली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिचा मृत्यू झाला. शहरातील फुटाणे रुग्णालयात मंगळवारी सकाळी ही घटना घडली. मृत महिलेच्या नातेवाइकांनी डॉक्टर, परिचारिकेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. अलिबाग पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. 

घोटवडे येथील सुचिता थळे (२९) हिला  प्रसूती वेदना  सुरू झाल्यानंतर डॉ. अनिल फुटाणे यांच्या रुग्णालयात सोमवारी दाखल केले. प्रसूतीसाठी सिझेरियन करावे लागेल, असे डॉ. फुटाणे यांनी सांगितले. त्यानुसार सिझेरियन केले. तिने बाळाला जन्म दिला. 

सुचिताला मुलगा झाला म्हणून कुटुंबीय आनंदित होते. सायंकाळपर्यंत तिची तब्येत चांगली होती. रात्री छातीत जळजळ होत असल्याचे तिची जाऊ आश्लेषा थळे हिने परिचारिकांना सांगून डॉक्टरांना बोलावण्याची वारंवार विनंती केली. 

मात्र, मंगळवारी सकाळी सुचिताची प्रकृती अधिक  बिघडली. त्यानंतर आश्लेषा यांनी याकडे लक्ष वेधण्यासाठी आरडाओरड केल्यानंतर डॉक्टर आले. त्यांनी तिला जिल्हा रुग्णालयात हलविण्यास सांगितले. मात्र, जिल्हा रुग्णालयात आणण्यापूर्वी  तिचा मृत्यू झाला होता, अशी माहिती सुचिताच्या नातेवाइकांनी दिली.

गुन्हा दाखल करा 

या घटनेमुळे सुचिताचे नातेवाईक संतप्त झाले होते. जिल्हा रुग्णालयात त्यांनी गर्दी केली होती. अखेर पोलिसांना बोलावण्यात आले. यावेळी डॉक्टर, परिचारिकांनी उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नातेवाइकांनी केली.  

सुचिता थळे ही महिला प्रसूतीसाठी आली होती. तिच्या पोटातील पाणी कमी झाल्याने सिझेरियन करावे लागेल असे सांगितले. प्रकृती सकाळपर्यंत चांगली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी हृदयाचे ठोके कमी पडू लागल्याने उपचार सुरू केले. जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिथेही प्रयत्न केले. मात्र, हृदयाचा रक्तपुरवठा बंद झाल्याने तिचा मृत्यू झाला. -अनिल फुटाणे, स्त्रीरोगतज्ज्ञ

टॅग्स :alibaugअलिबागpregnant womanगर्भवती महिलाhospitalहॉस्पिटलPregnancyप्रेग्नंसीDeathमृत्यू