शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

सर्वांनाच प्रतीक्षा जेएनपीटीच्या चौथ्या बंदराची, नोकरीच्या संधीमध्ये होणार वाढ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 6:38 AM

एनपीटी अंतर्गत कार्यान्वित होणाºया चौथ्या बंदरामुळे मालवाहतुकीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार असून, राज्याच्या व्यापारातही वृद्धी होणार आहे. त्याशिवाय जेएनपीटी नजीकच्या छोट्या बंदरामध्ये शिपिंग एजंट नोकरीच्या संधीमध्येही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे वाढ अपेक्षित आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कउरण : जेएनपीटी अंतर्गत कार्यान्वित होणाºया चौथ्या बंदरामुळे मालवाहतुकीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार असून, राज्याच्या व्यापारातही वृद्धी होणार आहे. त्याशिवाय जेएनपीटी नजीकच्या छोट्या बंदरामध्ये शिपिंग एजंट नोकरीच्या संधीमध्येही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे वाढ अपेक्षित आहे. यासाठी सर्वांनाच जेएनपीटीचे चौथे बंदर सुरू होण्याची प्रतीक्षा असल्याची प्रतिक्रिया मुंबई आणि न्हावा-शेवा शिपिंग एजंट संघटनेचे अध्यक्ष कॅप्टन विवेकसिंग आनंद यांनी व्यक्त केली.जेएनपीटी अंतर्गत उभारण्यात येणाºया भारत मुंबई कंटेनर टर्मिनल या चौथ्या बंदराचे पहिल्या टप्प्याचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. देशातील सर्वाधिक लांबीचे आणि वर्षाकाठी ४८ लाख कंटेनर हाताळणीची क्षमता असलेल्या बंदरावर ७ हजार ९१५ कोटी खर्च करण्यात येणार आहेत. पहिला टप्प्याचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर असून, या डिसेंबरअखेर कार्यान्वित होणार आहे. तर दुसºया टप्प्याचे काम २०२२पर्यंत पूर्ण करण्याची मुदत आहे. थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) आणि सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तून उभारण्यात येणारा देशातील पहिलाच बंदर प्रकल्प आहे. चौथे बंदर सुरू होण्याची प्रतीक्षा देशातील व्यापाºयांबरोबरच आंतरराष्ट्रीय व्यापारी कंपन्यांनाही आहे. जेएनपीटीतून आयात-निर्यात होणाºया वाढत्या मालाची वाहतूक सध्या अन्य राज्यांतून करावी लागते. त्यामुळे चौथे बंदर कार्यान्वित होण्याची उत्कंठा शिपिंग कंपन्यांनाही लागून राहिली आहे. जेएनपीटीअंतर्गत कार्यान्वित होणाºया चौथ्या बंदरामुळे बंदरातील मालवाहतुकीत वाढ होणार असून व्यापारातही वृद्धी होणार आहे.जेएनपीटीअंतर्गत सुरू होणारे बीएमसीटी बंदर आयात-निर्यात व्यापारात नक्कीच महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. माल हाताळणीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे बीएमसीटी टर्मिनल जेएनपीटी बंदराचीही कार्यक्षमता वाढणार आहे. त्यामुळे त्याचा सर्व बाजूने फायदा सर्वांनाच होईल, अशी अपेक्षा इंडियन प्रायव्हेट पोर्ट्स अ‍ॅण्ड टर्मिनल असोसिएशन (आयपीपीटीए)चे अध्यक्ष आर. किशोर यांनी व्यक्त केली.आर्थिक विकास शक्यभारत मुंबई कंटेनर टर्मिनल अर्थात चौथे बंदर पीएसए या परदेशी गुंतवणूकदार कंपनीचे आहे. ही कंपनी भारतात सुमारे २० वर्षे काम करीत आहे. देशातील तुतिकोरीन, चेन्नई, कोलकाता, काकीनाडी या बंदरांचे व्यवस्थापनही पीएसए कंपनी करते.या चौथ्या बंदरात येथील स्थानिक प्रकल्पग्रस्तांना जेएनपीटीशी झालेल्या सवलत करारातील अटी-शर्तीचे पालन करीत नोकºया देण्यात आल्या आहेत. याची जेएनपीटीनेही पुष्टी केली असल्याचा दावा बीएमसीटी प्रकल्पअधिकाºयांकडून केला जात आहे. नव्याने सुरू होणाºया या चौथ्या बंदरात सर्वच स्तरावरील कंत्राटदारांसह प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे. त्यामुळे अधिक रोजगार निर्माण होतील आणि आर्थिक विकास शक्य होईल, असा दावाही बीएमसीटी प्रकल्प अधिकाºयांकडून केला जात आहे.

टॅग्स :RaigadरायगडNavi Mumbaiनवी मुंबई