शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शिल्पा शेट्टीच्या आईवर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार; रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्षाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2021 09:32 IST

शिल्पा शेट्टीच्या आईची जमीन व्यवहारात फसवणूक, जुहू पोलिसांत गुन्हा दाखल; १ कोटी ६० लाखांचा चुना

ठळक मुद्देघारे याने ते परत देण्यास नकार दिला आणि त्यांना खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिली.कोर्टाने बुधवारी जुहू पोलिसांना याप्रकरणी गुन्हा दाखल करत चौकशी करण्यास सांगितले.कर्जत तालुक्यातील एक शेतघरासह जमिन विकत घेण्याचा व्यवहार सुनंदा शेट्टी यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्याशी केला होता

मुंबई : जमीन व्यवहार प्रकरणात फसवणूक झाल्याची तक्रार अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिची आई सुनंदा यांनी बुधवारी जुहू पोलिसांत दाखल केली आहे. कोर्टाच्या आदेशानुसार याप्रकरणी जुहू पोलिसांनी गुन्हा दाखल करत चौकशी सुरू केल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.सुनंदा शेट्टी यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, मे २०१९ ते फेब्रुवारी २०२० या दरम्यान कर्जत परिसरात चार हेक्टर जमिनीबाबत सुधाकर घारे यांच्यासोबत त्यांनी व्यवहार केला. मात्र काही काळानंतर सुनंदा यांना जमिनीची कागदपत्रे बोगस असल्याचे समजले.

मात्र जमिनीसाठी त्यांनी घारे याला १ कोटी ६० लाख रुपये दिले होते, त्यामुळे त्यांनी ते परत मागितले. मात्र घारे याने ते परत देण्यास नकार दिला आणि त्यांना खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिली. सुनंदा यांनी याप्रकरणी अंधेरी कोर्टाचा दरवाजा ठोठावला. त्यानुसार कोर्टाने बुधवारी जुहू पोलिसांना याप्रकरणी गुन्हा दाखल करत चौकशी करण्यास सांगितले. कोर्टाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल केला असल्याचे जुहू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशीकांत माने यांनी सांगितले.

सुनंदा शेट्टी यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार; सुधाकर घारे यांचा इशारा'मी शिल्पा शेट्टीच्या मातोश्री सुनंदा शेट्टी यांनी जमीन व्यवहार प्रकरणी फसवणूक केली नसून उलट त्यांनीच करारानुसार ४५ दिवसांत होणारा व्यवहार अद्याप पूर्ण न करता उलट माझ्यावरच फसवणुकीची तक्रार केली आहे. तसेच त्यांनी प्रसार माध्यमात माझी बदनामी सुरू केली आहे. त्यामुळे सुनंदा शेट्टी यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे.' असा इशारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी पत्रकार परिषदेत दिला. 

कर्जत तालुक्यातील एक शेतघरासह जमिन विकत घेण्याचा व्यवहार सुनंदा शेट्टी यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्याशी केला होता. हा व्यवहार मुदतीत पूर्ण न करता प्रत्येक वेळी तारीख पे तारीख देत तो आजपर्यंत लांबवत नेला आणि उलट घारे यांचीच तक्रार पोलीस ठाण्यात केली. प्रसार माध्यमांमधून याप्रकरणी भाष्य करण्यात आले. यामुळे बदनामी होत असल्याने घारे यांनी त्यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेवून खुलासा केला. यावेळी माजी नगराध्यक्ष शरद लाड उपस्थित होते. 

'मध्यस्थांच्या मार्फत माझ्या मालकीची असलेली खरवंडी येथे असलेले सर्व्हे नंबर २९ हिस्सा नंबर २ क्षेत्र २८ गुंठे व सर्व्हे नंबर २७ हिस्सा नंबर ६ क्षेत्र २७ गुंठे जमीन व त्यामधील शेतघर सुनंदा शेट्टी यांना पसंद पडले. त्यामुळे त्यांनी माझे शेतघर व शेत जमीनीचा व्यवहार करण्यासाठी त्यांच्याच वकिलामार्फत सर्च रिपोर्ट काढून स्वतःच्या नावे स्टॅम्प पेपर काढून सामंजस्य करार केला. हा व्यवहार ४५ दिवसांत पूर्ण करण्याचे त्या करारात नमूद केले. त्यावेळी हा व्यवहार ३ कोटी ७५ लाख रुपयांना ठरला होता. त्यांनी त्यावेळी बायाणा म्हणून १ कोटी ६० लाख रुपये धनादेशाद्वारे मला दिले. मात्र त्यांनतर मात्र पुढील व्यवहार पूर्ण झालेला नाही. - सुधाकर घारे, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद

 

 

टॅग्स :Shilpa Shettyशिल्पा शेट्टीCourtन्यायालयPoliceपोलिस