शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणार- बी. जी. कोळसे-पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 00:13 IST2020-03-04T00:13:14+5:302020-03-04T00:13:19+5:30
महिलांनी चूल आणि मूल विचार बाजूला ठेवून आपल्या न्याय, हक्कासाठी संघटित व्हा, रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी प्रामाणिकपणे जेएसडब्ल्यू कंपनी विरोधात लढणार आहे,

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणार- बी. जी. कोळसे-पाटील
वडखळ : महिलांनी चूल आणि मूल विचार बाजूला ठेवून आपल्या न्याय, हक्कासाठी संघटित व्हा, रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी प्रामाणिकपणे जेएसडब्ल्यू कंपनी विरोधात लढणार आहे, यात जिंकणार असल्याचे वक्तव्य माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी केले.
धरमतर खाडीला लागून जुई हब्बास, खारपाले, खारढोबी, माचेला गडबपर्यंत आठ किलोमीटर बंदिस्तीला खांडीबंदिस्ती त्वरित बांधून मिळाव्यात, शेतकºयांना नुकसानभरपाई मिळावी, तसेच जेएसडब्ल्यू कंपनीमुळे होणाºया प्रदूषणाला आळा घालणे, स्थानिकांना ८० टक्के रोजगार मिळावा आदी मागण्यांसाठी लोकशासन आंदोलन प्रणित वारकरी शेतकरी संघर्ष समितीचे संस्थापक माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत व माजी न्यायमूर्ती अध्यक्ष बी. जी. पाटील यांच्या पुढाकाराने खारपाले येथे सभा आयोजित केली होती.
या वेळी खारपाले परिसरातील नुकसानग्रस्त शेतकरी मोठ्या सांख्येने सभेला उपस्थित होते. कोळसे-पाटील म्हणाले की, मी आजवर ३० वर्षे आंदोलने केली आहेत आणि ती सर्व जिंकलोही आहे. रायगड जिल्ह्यात नागोठणे रिलायन्स व येथील जेएसडब्ल्यू स्टील कंपनीविरोधात आपला लढा आहे म्हणून पुढाºयांच्या मागे लागू नका, अन्याय करणारे कायदे मानू नका, संविधानाने सर्वांना सारखाच न्याय दिला आहे. मी प्रामाणिकपणे जिंदाल कंपनीविरोधात लढणार आहे. तुम्हीही एकत्र येऊन अन्याय करणाºया विरोधात उभे राहा, जेव्हा वारकरी व शेतकरी एकत्र येतात, तेव्हा अन्याय करणारे फुंकर मारल्यासारखे उडून जातात, असे संगितले. या वेळी राजेंद्र गायकवाड, पांडुरंग तुरे, धा. मा. पाटील, एल. बी. पाटील, यशवंत मढवी, विश्वनाथ शिंदे, कृष्णा राणे, नरेश गावंड आदीसह शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.