शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

रोह्यात इंदरदेवनजिकच्या डोंगरात वणव्याचे रौद्ररूप, धनगरवाडीतील ४८ घरांची राखरांगोळी; वनसंपदेचीही मोठी हानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 16:50 IST

वणव्यात वनसंपदेची मोठी नुकसान झाल्याचे समोर आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. सुदैवाने रात्रीचा मध्य सुमार नसल्याने जीवितहानी टळली.

शशिकांत मोरे -

धाटाव - जसजसे तापमान वाढत आहेत तसतशा उन्हाच्या झळानि अंगाची लाहिलाही होत आहे.डोंगर भागात दिवसागणिक लागणाऱ्या वणव्यात जंगल,पशू,प्राणी अक्षरशः होरपळून जाताना दिसत आहे.आधीच कळसगिरी व अन्य जंगले आगीच्या भस्मस्थानी पडत आहेत.प्रशासन मुख्यतः वन विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे वास्तव असतानाच काल गुरुवारी सायंकाळी उशिरा धामणसई हद्दीतील इंदरदेव धनगरवाडी डोंगराला अचानक लागलेल्या रौद्ररूपी वणव्याचा येथील ग्रामस्थांना सामना करावा लागला.या अचानक लागलेल्या वणव्यात अनेक घरे जळून खाक रांगोळी झाली.वणव्याचा भडका थरकाप उडविणारा होता. अनेकांची संसार उघड्यावर आली. वणव्यात वनसंपदेची मोठी नुकसान झाल्याचे समोर आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली.सुदैवाने रात्रीचा मध्य सुमार नसल्याने जीवितहानी टळली.       दरम्यान वणव्याचा भडका थरकाप उडविणारा होता.त्यातच वाऱ्याचा जोश असल्याने घरे भस्मसात होण्याची भीतीदायक घटना घडली तर वणवा आगीचे वृत्त समजताच आग लागल्याचे समजताच धाटाव येथील अग्निशामक दलाची वाहने आणि रोह्यातील बचाव कार्यासाठी सक्रिय असलेले एस.व्ही.आर.एस बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर ठेवून ग्रामस्थाच्या सहकार्याने आग नियंत्रणात आणली.वणव्याचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी उन्हाच्या कडाक्यामुळे आग वेगाने पसरल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.याठिकाणी प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड,तहसीलदार किशोर देशमुख यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिल्याची माहिती प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी दिली.    सायंकाळी लागलेल्या वणव्याचे आगीत रौद्ररूप झाले आणि वाऱ्याच्या जोशात भडकत गेलेल्या आगीने धनगरवाडीतील ४८ ग्रामस्थांची सांसारिक सामानाची अक्षरशः राखरांगोळी केली.सुदैवाने रात्रीचा मध्य सुमार नसल्याने जीवितहानी मात्र टळली.वणव्यात घरांची अक्षरशः होळी झाल्याने बाधित कुटुंबांचे लवकरच पुनर्वसन करण्यात यावे,अशी मागणी आता जोर धरत आहे.याठिकाणी आग विझविण्यासाठी तत्काळ मदतीसाठी आलेल्या अग्निशमन दलाच्या सर्व अधिकारी,कर्मचारी वर्ग यासह एस.व्ही.आर.एस बचाव पथकाचे अथक आणि धनगरवाडीतील ग्रामस्थ वर्गाचे कौतुक करण्यात येत असून आता वाढत्या वणव्यावर नियंत्रण,वणवा लावणाऱ्यांना पकडून कारवाई करण्याची मोहीम वन विभाग आतातरी घेईल का? असा प्रश्न समोर येत आहे.

टॅग्स :RaigadरायगडfireआगFire Brigadeअग्निशमन दल