शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
3
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
4
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
5
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
6
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
7
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
8
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
9
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
10
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
11
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
12
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
13
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
14
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
15
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
16
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
17
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
18
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
19
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
20
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 06:00 IST

मविआचे काम कोणत्याही पापापेक्षा कमी नसल्याची टीका : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला टप्पा, मुंबई मेट्रो लाइन-३ आणि ‘मुंबई वन’ या देशातील पहिल्या एकात्मिक कॉमन मोबिलिटी ॲपचे उद्घाटन

- नारायण जाधव/वैभव गायकरलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मुंबईवरील २६/११च्या हल्ल्यानंतर भारतीय लष्कर पाकिस्तानवर हल्ल्याच्या तयारीत हाेते. देशाची हीच मागणी होती. मात्र, दुसऱ्या देशाच्या दबावानंतर भारतीय लष्करास हल्ला करण्यापासून रोखले, असे वक्तव्य गृहमंत्री राहिलेल्या काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने केले आहे. यामुळे कोणत्या देशाच्या दबावाखाली व नेत्याच्या आईच्या सांगण्यावरून पाकवर भारताने हल्ला केला नाही, हे काँग्रेसने देशाला सांगावे, असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दिले. 

आमच्यासाठी देश आणि जनतेची सुरक्षितता महत्त्वाची आहे. त्यामुळे आम्ही घरात घुसून शत्रूला मारल्याचे संपूर्ण जगाला ऑपरेशन सिंदूरद्वारे दाखवून दिले, असेही मोदी म्हणाले. महाविकास आघाडीमुळे मुंबई मेट्रोचे काम थांबले होते. परिणामी देशाचे हजारो कोटींचे नुकसान झाले, हे पापापेक्षा कमी नाही, अशा शब्दांत पंतप्रधानांनी तत्कालीन मविआ सरकारचा समाचार घेतला. 

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याच्या लाेकार्पणासह मुंबई मेट्रो लाइन-३ च्या अंतिम टप्प्याचे तसेच ‘मुंबई वन’ या देशातील पहिल्या कॉमन मोबिलिटी ॲपचे उद्घाटन मोदींच्या हस्ते झाले. राज्यातील ४१९ आयटीआय आणि १४१ तंत्र संस्थांमध्ये २,५०६ बॅचेसच्या माध्यमातून अल्प मुदतीचे नवीन रोजगारक्षम अभ्यासक्रम या उपक्रमाची सुरुवातही यावेळी करण्यात आली. 

मेट्रो-३ विकसित भारताचे प्रतीकमुंबईची भूमिगत मेट्रो विकसित होणाऱ्या भारताचे प्रतीक असल्याचे सांगून पंतप्रधानांनी या प्रकल्पांसाठी काम केलेल्या कामगार, अभियंत्यांचे कौतुक केले. मेट्रो ३ चे भूमिपूजन माझ्या हस्ते झाले होते. मात्र, मधल्या काळात मविआचे लोक सत्तेत आले. त्यांच्यामुळे प्रकल्प रखडला. यातून देशाचे हजारो कोटींचे नुकसान झाले. हे एक प्रकारचे पाप असल्याची टीका त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख टाळून केली.

स्वदेशी स्वीकारा, देशाची क्षमता वाढवा

तुम्हाला स्वदेशी स्वीकारण्याचा आग्रह करतो. अभिमानाने जाहीर करा, ‘ही स्वदेशी आहे.’ स्वदेशी हा प्रत्येक घराचा आणि प्रत्येक बाजारपेठेचा मंत्र असला पाहिजे. प्रत्येक नागरिक स्वदेशी वस्तू घरी आणेल आणि स्वदेशी वस्तू भेट देईल. यामुळे भारताचा पैसा देशात राहील. त्यातून भारतीय कामगारांना काम मिळेल आणि तरुणांना रोजगार मिळेल. जेव्हा संपूर्ण भारत स्वदेशी स्वीकारेल, तेव्हा भारताची क्षमता किती वाढेल याची कल्पना करा.

नवभारताचे व अभियंत्यांच्या काैशल्याचे उदाहरणनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नवभारताचे प्रतीक आहे. भारतीय अभियंत्यांच्या कौशल्याचे अद्भुत उदाहरण म्हणजे हे विमानतळ आहे.  महाराष्ट्रासाठीच नाही तर संपूर्ण देशाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावणारे हे विमानतळ असून, त्यामुळे राज्याचा जीडीपीदेखील एक टक्क्याने वाढणार आहे. या विमानतळामुळे नवी मुंबई जगाच्या नकाशावर आली आहे. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

माेदी म्हणाले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाची सुरुवात मराठीत केली. लोकनेते दि. बा. पाटील यांनी समाज आणि शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्यातून प्रेरणा मिळते, असे मोदी म्हणाले. जिथे गती आणि प्रगती दोन्ही आहे,  तिथे देशाचा विकास हाेताे, असे  पंतप्रधान म्हणाले. नवी मुंबई विमानतळ शिवाजी महाराजांच्या भूमीत असून, त्याचा आकार कमळासारखा आहे. या विमानतळाचा लाभ महाराष्ट्रातील शेतकरी आणि मच्छीमारांना होणार आहे. युरोप, मध्य पूर्वेला येथील शेतकरी जोडले जातील. महाराष्ट्रातील मासळी, फळे, भाज्यांना जागतिक बाजारपेठ मिळेल असे पंतप्रधान म्हणाले. देशात असेही लोक आहेत, जे फक्त सत्तेला महत्त्व देतात. असे लोक अडथळे आणून भ्रष्टाचार करत विकास प्रकल्प स्थगित ठेवतात.विमानतळांच्या वाढत्या संख्येमुळे विमान उत्पादकांकडे भारतीय कंपन्यांची एक हजार विमानांची ऑर्डर बुक झाली आहे. पायलट, क्रू मेंबर, तंत्रज्ञांना रोजगार मिळून भारत एमआरओ हब बनवणे हे आमचे लक्ष्य आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Modi questions Congress: Who stopped the Pak attack and why?

Web Summary : PM Modi questioned Congress about halting the Pakistan attack after 26/11. He criticized the previous government for delaying projects, causing economic loss. Modi inaugurated airport and metro projects, emphasizing self-reliance for national growth.
टॅग्स :AirportविमानतळNavi Mumbaiनवी मुंबईNarendra Modiनरेंद्र मोदी