शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"ज्यांनी एवढं मोठं केलं..."; शरद पवारांचं घर कुणी फोडलं? शिवसेना नेत्याचा मोठा गौप्यस्फोट, बड्या नेत्याचं नाव घेतलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 15:29 IST

आता शरद पवारांचे घर कुणी फोडले? यासंदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे लोकसभेचे उमेदवार अनंत गीते यांनी एका बड्या नेत्याचे नाव घेत मोठा गोप्यस्फोट केला आहे. 

संपूर्ण राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच पक्ष जबरदस्त प्रचार करत आहे. महत्वाचे म्हणजे, दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी काँग्रेस हे फुटीनंतर पहिल्यांदाच निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत. प्रचारादरम्यान एका पक्षाचे नेते दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यातच, आता शरद पवारांचे घर कुणी फोडले? यासंदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे लोकसभेचे उमेदवार अनंत गीते यांनी एका बड्या नेत्याचे नाव घेत मोठा गोप्यस्फोट केला आहे. ते रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे एका सभेत बोलत होते.

गीते म्हणाले, "पक्ष फोडला इथपर्यंत मी समजू शकतो. राजकारणात या गोष्टी घडतात. पण केवळ पक्ष नाही फोडला घरही फोडलं. ज्या शरद पवारांनी एवढं मोठं केलं त्या पवार साहेबांचं घर फोडलं. आता ज्या शरद पवार साहेबांचं घर फोडलंय, आज जवळ जवळ 84 वर्ष त्यांचं वय आहे. या शेवटच्या काळात या वेदना त्यांना दिल्या आहेत. हे फोडण्याचं काम केलं कुणी? या सर्वांचा सूत्रधार..., कोण आहे जोरात सांगा... अरे पवार साहेबांचं घर कोणी फोडलं... नावच आहे 'तट-करे'." 

शरद पवार गीतेंना काय म्हणाले? -"पवार साहेबांचं घर त्याने (सुनिल तटकरे) फोडलं आणि याचं शल्य त्यांच्या (शरद पवार) हृदयात आहे. सरकार गेले, आमदार गेले खासदार गेले, याचे दुःख त्यांना नाही. त्यांच्याकडे क्षमता आहे. ते नव्याने आणखी जन्माला घालू शकता. पण माझं घर यानं फोडलंय याला धडा शिकवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार केलाय आणि म्हणून पवार साहेबांनी सांगितलंय, गीते मला त्याला धडा शिकवायचा आहे. म्हटलं साहेब शंभर टक्के, यावेळेला सुनिल तटकरेंना रायगडच्या राजकारणातून अनंत गीते हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही," असेही गीते यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Anant Geeteअनंत गीतेSharad Pawarशरद पवारsunil tatkareसुनील तटकरे