शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

धबधबे बनले मृत्यूचा सापळा, निष्काळजीपणामुळे अपघातांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 3:42 AM

मुंबई, ठाणे, नवी मुंबईमधील नागरिकांकडून पावसाळी पर्यटनासाठी पनवेलमधील गाढी नदी परिसराला प्रथम पसंती दिली जात आहे. परंतु योग्य काळजी घेतली जात नसल्यामुळे या परिसरामध्ये नदीमध्ये वाहून मृत्यू झालेल्या पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे.

- मयूर तांबडेपनवेल : मुंबई, ठाणे, नवी मुंबईमधील नागरिकांकडून पावसाळी पर्यटनासाठी पनवेलमधील गाढी नदी परिसराला प्रथम पसंती दिली जात आहे. परंतु योग्य काळजी घेतली जात नसल्यामुळे या परिसरामध्ये नदीमध्ये वाहून मृत्यू झालेल्या पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. २०११ पासून तब्बल १७ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. पर्यटनाच्या नावाखाली मद्यपींचा गोंधळ वाढू लागला असल्यामुळे या परिसरामध्ये पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्याची वेळ पोलिसांवर आली आहे.पावसाळा सुरू झाला की पनवेल तालुक्यातील नद्या व धबधबे पर्यटकांना खुणावू लागतात. गाढी नदीच्या परिसरामध्ये शनिवार व रविवारी हजारो पर्यटक गर्दी करत असतात. गाढेश्वर धरण, गाढी नदी, मोरबे धरण, नदी परिसराला प्रथम पसंती दिली जाते. परंतु या परिसरातील पर्यटनस्थळाकडे रायगड जिल्हा प्रशासन व वनविभागाने नेहमीच दुर्लक्ष केले आहे. धबधबे व नदीपात्रामध्ये नागरिक गर्दी करत असलेल्या ठिकाणी कोणत्याच सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. यामुळे पर्यटक मनमानीपणे धबधब्यामध्ये व नदीमध्ये उतरतात व अपघात होवून अनेकांना प्राण गमवावे लागत आहे. पहिल्याच पावसामध्ये गाढेश्वर धरण हाऊसफुल्ल होते. पाऊस वाढला की नदीचा प्रवाह अचानक वाढतो. पर्यटकांना पाण्याच्या वेगाचा अंदाज येत नाही व पाण्यात उतरलेले अनेकजण वाहून जातात. प्रत्येक वर्षी तीन ते चार जणांना जीव गमवावा लागत आहे. पोलिसांकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीवरून २०११ पासून तब्बल १६ जणांना जीव गमवावा लागला आहे. यामध्ये तरुणांचे प्रमाण सर्वाधिक आहे. बहुतांश अपघात सुरक्षेविषयीच्या निष्काळजीपणामुळे झाले असल्याचे उघड झाले आहे.पावसाळी पर्यटनासाठी पनवेल परिसरामध्ये कौटुंबिक सहलीचे प्रमाण जास्त आहे. परंतु काही वर्षांमध्ये मद्यपी तरुणांचा वावर या परिसरामध्ये वाढला आहे. नदी व धबधब्याच्या परिसरामध्ये उघड्यावर मद्यपान करून गोंधळ घालत असल्याने कुटुंबीयांसह येणाऱ्या पर्यटकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली होती. यामुळे पोलिसांनी परिसरामध्ये धोकादायक ठिकाणी जाण्यास बंदी घातली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतला असला तरी पोलिसांची नजर चुकवून नदी व धबधबा परिसराकडे प्रत्येक रविवारी हजारो पर्यटक जात आहेत. अपघात होवून कोणाचा मृत्यू होवू नये यासाठी पर्यटकांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही केले जात आहे. पर्यटकांना सूचना देण्यासाठीचे फलक विविध ठिकाणी लावले आहेत.गाढेश्वरसह नेरे परिसरामध्ये लावलेल्या सूचनामाथेरान परिसरामध्ये झालेल्या पावसामुळे नदीमधील पाण्याचा प्रवाह कमी जास्त होत असून बुडून मृत्यू होण्याची शक्यता जास्त असल्यामुळे पर्यटकांनी योग्य काळजी घ्यावी.गाढेश्वर धरणातून पनवेल शहरास पाणीपुरवठा होत असतो यामुळे धरणात खाद्यपदार्थ व इतर वस्तू टाकून पात्र दूषित करू नयेलहान मुले व स्त्रियांसह ज्यांना पोहता येत नाही त्यांनी नदीपात्रामध्ये उतरू नयेअमली पदार्थ, दारू व तत्सम मादक द्रव्य आणण्यास व पिण्यास मनाई असून मद्यपान किंवा मादक पदार्थांचे सेवन करताना कोणी आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल.हा परिसर डोंगराळ असून रस्ते अरुंद आहेत. एखादी दुर्घटना घडल्यास अग्निशमन वाहने, रुग्णवाहिका जाण्यास खुला असणे आवश्यक असल्यामुळे रोडच्या कडेला वाहने उभी करू नयेत.वर्षा सहलीसाठी येणाºया पर्यटकांनी वाहनांचा वेग मर्यादित ठेवावा, नशा करून वाहन चालवू नयेगाढेश्वर धरण, मोरबे धरण, बढी कुंडी धरण परिसर कलम १४४ प्रमाणे पावसाळी पर्यटनासाठी प्रतिबंधित करण्यात आला असून या नियमांचे उल्लंघन करणाºयांवर कारवाई करण्यात येईलपनवेल परिसरामध्ये बुडून मृत्यू झालेल्यांचा तपशीलदिनांक नाव ठिकाण१३ जून २०११ श्याम वानखेडे (अमरावती) बढीकुंडी धबधबा१३ जून २०११ रणजीत गावकर - चेंबूर गाढी नदी४ जुलै २०११ अनोळखी व्यक्ती -२५ जुलै २०१२ किरण कानू जाडे - ठाणा नाका बढीकुंडी धबधबा२७ जून २०१३ खगेंद्र सिंग बुढाल- नवी मुंबई गाढी नदी१४ जुलै २०१३ विश्वास घरत - उरण गाढी नदी२८ जुलै २०१३ सुलक्षण सोनावणे - नेरूळ शांतीवन नेरे१९ सप्टेंबर २०१३ दत्तात्रय पाठक - विहिघर गाढी नदी, कोप्रोली१९ सप्टेंबर २०१४ अनोळखी व्यक्ती कासाडी नदी३१ जुलै २०१६ राहुल डोंबले- कामोठे धोदाणी धबधबा१६ सप्टेंबर २०१६ विजय सुदाम गायकवाड- नेरे हलडोली, गाढी नदी२४ सप्टेंबर २०१६ प्रेमाबाई चांगा पाटील गाढी नदी३ डिसेंबर २०१६ गणेश बारकू देशेकर - चिंध्रण कासाडी नदी२६ जून २०१६ दीपक मोहन खडूू - खार, मुंबई गाढी नदी२६ जून २०१६ किशोर मोतीराम चामुट गाढी नदीनागरिकांची जीवितहानी टाळण्यासाठी व महिलांच्या छेडछाडीचे प्रकार टाळण्यासाठी या परिसरात मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांनी देखील या परिसरात येणे टाळावे.- अशोक राजपूत,वरिष्ठ पोलीस निरीक्षक,तालुका पोलीस ठाणे

टॅग्स :Raigadरायगड