महाड एमआयडीसीत शिरले पुराचे पाणी
By Admin | Updated: July 3, 2016 03:05 IST2016-07-03T03:05:28+5:302016-07-03T03:05:28+5:30
महाड एमआयडीसीमध्ये पडलेल्या मुसळधार पावसाने एमआयडीसीतील रस्त्यावर पूर परिस्थिती निर्माण होऊन नाल्याचे पाणी थेट कंपनीमध्ये घुसल्याने हितकारी ३५ लाख रुपयांचे

महाड एमआयडीसीत शिरले पुराचे पाणी
बिरवाडी : महाड एमआयडीसीमध्ये पडलेल्या मुसळधार पावसाने एमआयडीसीतील रस्त्यावर पूर परिस्थिती निर्माण होऊन नाल्याचे पाणी थेट कंपनीमध्ये घुसल्याने हितकारी ३५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती कंपनी व्यवस्थापकांनी दिली आहे. गाड्यांसाठी लागणाऱ्या कारपेटची निर्मिती या कंपनीमध्ये केली जाते.
२ जुलैला सकाळी ६.३० वाजता या कंपनी परिसरात सुमारे दोन ते अडीच फूट पुराचे पाणी शिरल्याने कंपनीमधील उत्पादनाचा माल, साहित्य, भिजल्याने सुमारे ३५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. एमआयडीसी प्रशासनाकडून पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करण्यात टाळाटाळ झाल्याने तसेच नवीन कारखान्यांना परवानग्या देताना नियमांचे उल्लंघन झाल्याने एमआयडीसी परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली होती.
पूर परिस्थितीचा फटका मल्लिकार्जुन या प्राचीन शंकर मंदिराला बसला आहे. या मंदिरामध्ये गेल्या आठ दिवसांपासून पावसाचे पाणी घुसले असून, या ठिकाणी भाविकांना विधिवत पूजा व दर्शनाकरिता जाता येत नसल्याची माहिती बिरवाडीचे माजी सदस्य सचिन बगाडे यांनी दिली आहे. (वार्ताहर)