शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

ग्रामस्थांना मदरशातून पाणीपुरवठा; ममदापूरमध्ये खानकाहे संस्थेचे सहकार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2019 11:07 PM

उल्हासनदीवर जाण्यासाठीची पायपीट थांबली

विजय मांडेकर्जत : नेरळ विकास प्राधिकरणचा भाग असलेल्या आणि नेरळ शहराला लागून असलेल्या ममदापूर गावामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई आहे. तेथील अर्ध्या भागाला मुस्लीम विद्यार्थ्यांच्या मदरशामधून पाणी पुरविले जाते. खानकाहे या मदरशामधून पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामस्थांची तहान भागत आहे. त्यामुळे उल्हासनदीवर पाण्यासाठी जाण्याची पायपीट थांबली आहे.

ममदापूर हे हिंदू-मुस्लीम लोकवस्ती असलेले गाव असून, या गावाला नेरळ ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठा केला जातो. पूर्वी ममदापूर गाव हे एकत्रित नेरळ ग्रामपंचायतीमध्ये होते आणि त्यामुळे १९९७ मध्ये नेरळ गावाची नळपाणी पुरवठा योजना झाली, त्या वेळी नेरळ गावातून ममदापूरला पाणी देण्यास सुरुवात झाली. आजपर्यंत ममदापूर गावाला नेरळ ग्रामपंचायतीच्या पाणी योजनेमधून पाणी दिले जाते आणि त्या बदल्यात नेरळ ग्रामपंचायत पाणीपट्टीही वसूल करीत होती. मात्र, मागील काही वर्षे ममदापूर गावाला फार अल्प दाबाने पाणीपुरवठा होत असून, त्या कारणाने ममदापूर ग्रामस्थ नेरळ ग्रामपंचायतला पाणीपट्टी भरत नाहीत. ममदापूर ग्रामपंचायतीमध्ये गेल्या काही वर्षांत होत असलेले नागरीकरण लक्षात घेता नेरळ ग्रामपंचायतीचे पाणी ममदापूर गावतील पहिल्या टप्प्यातून पुढे जात नाही. गेली काही वर्षे ममदापूर गावात ही समस्या असून, ममदापूर गावासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने नळपाणी योजना मंजूर केली असून उल्हासनदीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या त्या नळपाणी योजनेचे काम संथगतीने सुरू असल्याने योजना पूर्ण होण्याचे वेळापत्रक निश्चित नाही. त्यामुळे आधीपासून ममदापूर गावात अर्ध्या भागातील पाणीपुरवठा ही समस्या आणखी कठीण बनत आहे. ममदापूरमधील भडवळ गावाकडील भागात असलेल्या १०० हून अधिक घरातील रहिवासी पावसाळा वगळता अन्य दिवशी उल्हासनदीवर बैलगाडीमधून पाणी आणतात. त्याच वेळी महिलादेखील कपडे धुुण्यासाठी दररोज गावापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या उल्हासनदीवर जात असतात. ही समस्या लक्षात घेऊन ममदापूर गावाच्या बाहेर मुस्लीम विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम करणारा मदरसा आहे, त्या खानकाहे हे नाव असलेल्या मदरशामधील व्यवस्थापक सलीम दुराणी यांनी ममदापूर ग्रामस्थ यांची पाण्यासाठी वणवण बघून आपल्या संस्थेमधून एक पाइपलाइन टाकून ते पाणी खालच्या भागात दोन ठिकाणी टाक्या उभ्या करून त्यात सोडले. त्या दोन्ही टाक्यांना खाली नळ बसवून ठरावीक वेळी ते पाणी सोडून ममदापूर ग्रामस्थ आपली पाण्याची तहान भागवत असतात.

घरात पाणी येण्यासाठी पाइपलाइनचे काम सुरूगावात नव्याने उपसरपंच झालेले जुबेर पालटे यांनी खानकाहेमधून आलेले पाणी हे सर्व ग्रामस्थांच्या घरात पोहोचले पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरू केले असून घरटी काही ठरावीक रक्कम काढून त्यात सर्व भागात पाइपलाइन फिरवली जात आहे. प्रत्येक घराजवळ टॅब मारून ठेवले आहेत. घरमालकाने आपल्या घरात पाणी नेण्यासाठी पाइपलाइन टाकून घ्यावी.

पाणी घरात नेण्याचे काम हाती घेतले आहे. खानकाहे या संस्थेमुळे ममदापूर गावातील महिलांची धावपळच कमी झाली नाही तर आता त्यांच्या घरात पाणी पोहोचले आहे. त्या भागात वस्ती करून राहणाऱ्या हिंदू आणि मुस्लीम अशा सर्वांना खानकाहे संस्थेकडून पाणी मिळू लागल्याने ऐन पाणीटंचाई काळात ग्रामस्थांची धावपळ वाचली आहे.

आमच्याकडे भरपूर पाणी असल्याने आम्ही ग्रामस्थांची पाण्यासाठी हंडे घेऊन सुरू असलेली धावपळ बघून पाण्याची पाइपलाइन दिली. आता त्यांनी घरात नळ देऊन महिला भगिनींचे कष्ट आणखी कमी केले आहेत याचा आंनद आहे. - सलीम दुराणी, व्यवस्थापक, खानकाहे मदारशा

खानकाहे संस्थेने ममदापूर गावातील पाणीटंचाई असलेल्या भागात पाणी दिल्यानंतर आता आम्ही घरात पाणी पोहोचविण्याचे काम करीत आहोत. त्यासाठी आमचे उपसरपंच जुबेर पालटे जातीने लक्ष घालत असून नवीन नळपाणी योजना पूर्ण झाल्यावर आमचा सर्वांचा पाणीप्रश्न सुटणार आहे. - दामा निगुर्डा, सरपंच

ममदापूरमधील ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत होती, ही परिस्थिती पाहून खानकाहे संस्थेने मदरशातून गावासाठी पाणी उपलब्ध करून दिले. यामुळे ग्रामस्थांची गैरसोय दूर झाली. यामुळे ग्रामस्थ या संस्थेचे आभार मानत आहेत.