५७ वाड्यांना तीन टँकरने पाणीपुरवठा
By Admin | Updated: May 11, 2016 02:10 IST2016-05-11T02:10:01+5:302016-05-11T02:10:01+5:30
तालुक्यातील दुर्गम भागातील गावे व वाड्यांना पाणीटंचाईची झळ पोहोचू नये, यासाठी येथील प्रशासनाने कंबर कसली आहे. साडेसत्तेचाळीस लाखांचा पाणीटंचाई निवारण कृती

५७ वाड्यांना तीन टँकरने पाणीपुरवठा
श्रीवर्धन : तालुक्यातील दुर्गम भागातील गावे व वाड्यांना पाणीटंचाईची झळ पोहोचू नये, यासाठी येथील प्रशासनाने कंबर कसली आहे. साडेसत्तेचाळीस लाखांचा पाणीटंचाई निवारण कृती आराखडा तालुक्यासाठी तयार केला आहे.
मार्चपासून तालुक्यातील ३८ गावांतील ५७ टंचाईग्रस्त वाड्यांना तीन शासकीय वाहनांनी पाण्याचा पुरवठा सुरू केला आहे, तर ८१ विंधन विहिरी तयार करण्याचे प्रस्तावित आहे. यंदा पाऊस कमी प्रमाणात पडल्याने जमिनीमध्ये पाहिजे त्या प्रमाणात पावसाचे पाणी मुरले नाही. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी आवश्यक प्रमाणात भरलेली नाही. टंचाईग्रस्त वाड्यांना व गावांना पिण्याच्या पाण्याची झळ पोहोचू नये, यासाठी प्रशासन योग्य ती खबरदारी घेत असून टंचाईच्या परिस्थितीवर प्रशासन व लोकप्रतिनिधींनी लक्ष केंद्रित केले आहे.
तालुक्यातील दुर्गम भागातील गावे व वाड्यांनमध्ये पाणीटंचाई झाली असून येथील नागरिकांना पायपीट करुन दूर वरून पाणी आणावे लागत आहे. यामध्ये महिलांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. दिघी, बागमांडला, हरेश्वर, मारल, कुडगाव आशा अनेक गावांत पिण्याच्या पाण्याचा टंचाई कृती आराखडा प्रशासनाने तयार केला असला तरी यंदा पाणीटंचाईग्रस्त वाड्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. श्रीवर्धन तालुका टँकरमुक्त करण्यासाठी तालुक्यातील अनेक अपूर्ण पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याची गरज आहे. (वार्ताहर)