जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आगंतुक कक्ष
By Admin | Updated: May 24, 2016 01:44 IST2016-05-24T01:44:10+5:302016-05-24T01:44:10+5:30
जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या आणि तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आगंतुक कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आगंतुक कक्ष
मुरु ड/ बोर्ली मांडला : जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या आणि तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आगंतुक कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या आगंतुक कक्षामध्ये पारपत्र, चारित्र्य पडताळणी, पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयामार्फत मिळणारे विविध प्रकारचे परवाने तसेच जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी, अधिकारी यांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या एक खिडकी योजनेप्रमाणे आगंतुक कक्षाचे कामकाज चालणार आहे. ‘समाधान हेल्पलाइन’ याच कक्षाचा एक भाग आहे. याद्वारे पोलीस कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेवून त्यांचे सात दिवसात सोडवून समाधान करण्यात येणार आहे.त्याचप्रमाणे नागरिकांनी नोंदविलेल्या तक्र ारींचे निराकरणही या कक्षाद्वारे करण्यात येणार आहे.
आगंतुक कक्षामध्ये सहायक पोलीस निरीक्षक दर्जाचे दोन अधिकारी आणि पाच पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती असून एक अधिकारी हे आगंतुक कक्षाचे प्रभारी अधिकारी म्हणून कार्यभार पाहणार आहेत. तर दुसरे जिल्ह्याचे जनसंपर्क अधिकारी म्हणून काम बघणार आहेत. आगंतुक कक्ष हे प्रशस्त, वातानुकूलित व अत्याधुनिक सोयी - सुविधांनी युक्त असे स्थापन करण्यात आले आहे. तसेच या ठिकाणी नागरिकांकरिता विविध प्रकारची पुस्तके, मासिके, वर्तमानपत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. महाराष्ट्र शासनातर्फे २६ जानेवारी २०१६ पासून कार्यान्वित झालेल्या ‘आपले सरकार’ या योजनेची सांगड ही समाधान कक्षाशी घातली जाणार आहे. (वार्ताहर)
नागरिकांना आवाहन
नागरिकांनी आपल्या समस्या निराकरणासाठी समाधान कक्षाशी संपर्कसाधण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. यामुळे तक्रारीचे लवकर निराकरण होणार आहे.