शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: कोरोनाचा सेलिब्रिटींनीही घेतला धसका?; विराट, अनुष्कानं अलिबागमध्ये हलवला मुक्काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 19:33 IST

Coronavirus: मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळल्यानं कोहली, अनुष्का मांडवा फार्म हाऊसमध्ये

-आविष्कार देसाईअलिबाग : कोरोना विषाणूचा फटका सर्वांनाच बसलेला आहे. त्यातून चित्रपट, क्रिकेट जगतातील सेलिब्रिटीदेखील यामधून सुटलेले नाहीत. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी थेट अलिबाग-मांडवा गाठले आहे.  भारतीय क्रिकेटचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा अलिबाग तालुक्यातील आवास येथे आलिशान बंगला आहे. त्या बंगल्यामध्ये हे दाम्पत्य गेल्या पाच-सहा दिवसांपासून वास्तव्यास होते. परंतु सातत्याने नागरिक त्यांना पाहण्यासाठी गर्दी करत असल्याने तेथून त्यांनी मुक्काम हलवला असल्याचे विश्वसनीय सुत्रांनी लोकमतला सांगितले.अलिबाग-मांडवा परिसरामध्ये बडे उद्योजक आणि सेलिब्रिटींचे फार्म हाऊस, बंगले आहेत. मुंबईपासून अवघ्या 16 सागरी मैल अंतरावर असलेल्या मांडवा परिसरात त्यांचे अधून-मधून विशेष करुन वीक एण्डला येणे-जाणे असते. सध्या जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. देशातील, राज्यातील कोरोना बांधीतांचा आकडा हा वाढतच आहे. त्यामुळे सरकार आणि प्रशासन खबरदारीसाठी विविध उपाय योजना करत आहेत. सध्या तरी अलिबागमध्ये कोरानाबाधित अथवा कोरोनाचा संशयीत सापडलेला नाही.  सहा दिवसांपूर्वी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा-कोहली यांचे मांडवा जेटीवर आगमन झाले होते. त्यानंतर ते आवास येथील रवी शास्त्री यांच्या बंगल्यावर गेले. त्या बंगल्यात दोघेही राहात असल्याने त्यांची एक झलक पाहण्यासाठी नागरिक बंगल्याच्या बाहेर गर्दी करू लागले. गर्दीवर नियंत्रण ठेवताना पोलिसांची डोकेदुखी वाढली. सातत्याने नागरिकांचा वाढता त्रास पाहून विराट अनुष्काने बंगल्यातील आपला मुक्काम हलवला असल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले. सध्या कातळपाडा येथील एका फार्महाऊसमध्ये ते राहत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव नागरिकांनी गर्दी करु नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसVirat Kohliविराट कोहलीAnushka Sharmaअनुष्का शर्माRavi Shastriरवी शास्त्री