शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

कोंझर गावातील मोबाइल टाॅवरला ग्रामस्थांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 11:55 PM

टाॅवर स्थलांतर करण्यास प्रशासनाची टाळाटाळ; जिल्हा परिषदेकडे केला पत्रव्यवहार

दासगाव : किल्ले रायगड परिसरातील कोंझर गावात जिओ कंपनीद्वारे मोबाइल टाॅवर उभा करण्यात आला आहे. हा टाॅवर गावापासून काही अंतर लांब उभा केला जावा, अशी मागणी ग्रामस्थांनी करत टाॅवर उभा करताना महसूल आणि ग्रामपंचायतीचे कायदे धाब्यावर बसवण्यात आल्याचे ग्रामस्थांनी माहिती अधिकारात विचारलेल्या माहितीमधून समोर आले आहे. यामुळे महाड पंचायत समितीनेदेखील या टाॅवरबाबत कार्यवाही व्हावी याकरिता जिल्हा परिषदेकडे पत्रव्यवहार केल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

महाड तालुक्यात एका खासगी कंपनीद्वारे मोबाइल टाॅवर उभे करण्याचा धूमधडाका सुरू करण्यात आला आहे. या कंपनीला केंद्र शासनाचा वरदहस्त असल्याने स्थानिक प्रशासन टाॅवर उभे करताना लागणाऱ्या निकषांकडे दुर्लक्ष करत आहे. अशाच प्रकारे किल्ले रायगड परिसरातील कोंझर गावात भरवस्तीत मोबाइल टाॅवर उभा करण्यात आला आहे. मात्र या टाॅवरला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध दर्शवला आहे. याबाबत महाड पंचायत समिती आणि महाड महसूल विभागाला टाॅवर गावापासून लांब उभा केला जावा यासाठी तक्रारीवजा मागणी केली आहे. 

या तक्रारीत स्थानिक ग्रामस्थ विजय कदम यांनी टाॅवरची मागणी केलेल्या अर्जाची संपूर्ण माहिती ग्रामसेवकांकडून मागून घेतली असता या मागणी अर्जाला जोडण्यात आलेल्या सातबारामध्ये फरक असल्याचे तहसीलदार सुरेश काशीद यांच्या निदर्शनास आणून दिले. मात्र याबाबत आजतागायत कोणतीच कारवाई न करता महसूल प्रशासनाने विनापरवाना वाणिज्य वापर केल्याबाबत सुमारे ९३४९०ची दंडात्मक कारवाई ९ नोव्हेंबर २०२० रोजी केली आहे. आपण केवळ दंडात्मक कारवाई करू शकतो असे कारण पुढे करत तहसीलदार काशीद यांनी टाॅवर स्थलांतर मागणीकडे दुर्लक्ष केले आहे.       

कोंझर गावात उभ्या केलेल्या टाॅवरमुळे आजूबाजूच्या ग्रामस्थांना धोका निर्माण झाला असून हा टाॅवर उभा करताना कोणतेच शासकीय नियम पाळलेले नाहीत. यामुळे हा टाॅवर गावापासून काही अंतरावर स्थलांतर करावा.– विजय कदम, तक्रारदार

तत्कालीन सरपंचाने या मोबाइल टाॅवरला परवानगी दिलेली असून यामध्ये अनेक त्रुटी असल्याचे समोर आले आहे, यामुळे टाॅवर स्थलांतर केला जावा.– सुवर्णा राजू रेवणे, सरपंच, कोंझर

 

टॅग्स :Raigadरायगड