पनवेलमध्ये अवतरला विक्रम लँडर
By वैभव गायकर | Updated: October 29, 2023 14:59 IST2023-10-29T14:59:07+5:302023-10-29T14:59:35+5:30
दरवर्षी मॉल प्रशासनाकडून विविध उपक्रम राबवत सामाजिक बांधिलकी जपली जाते.

पनवेलमध्ये अवतरला विक्रम लँडर
पनवेल - भारताची यशस्वी चंद्रयान मोहिमेमुळे जगभरात डंका वाजला. देशाभिमान जागविणाऱ्या या मोहिमेतील विक्रम लँडरची हुबे हुब प्रतिकृती पनवेल मधील ओरियन मॉलमध्ये अवतरली आहे. दिवाळीच्या पार्श्वभुमीवर ओरियन मॉलने यावर्षी ही नवीन थीम साकारली आहे.
दरवर्षी मॉल प्रशासनाकडून विविध उपक्रम राबवत सामाजिक बांधिलकी जपली जाते. मागील वर्षी साकारलेली आयएनएस विक्रांतची प्रतिकृती पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी मॉलला भेट दिली होती. हा प्रतिसाद पाहता तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हीच प्रतिकृती थेट मंत्रालयात प्रदर्शनासाठी ठेवले होते. पुन्हा एकदा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विक्रांत लँडरची प्रतिकृती दिवाळीचे विशेष आकर्षण असणार असल्याची माहिती ओरियन मॉलचे मालक मंगेश परुळेकर यांनी दिली. या विक्रम लँडरची प्रतिकृती उभारण्यास लाखो रुपयांचा खर्च आला आहे.