कोरोनाविरुद्ध जिंकले, पण नियतीसमोर हरले; कोरोना योद्ध्याचा कुटुंबासह अपघाती मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 07:46 AM2021-02-16T07:46:26+5:302021-02-16T07:46:53+5:30

Mumbai Pune Expressway Accident: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पाच वाहनांचा भीषण अपघात; ५ जणांचा मृत्यू, ५ जखमी

Veterinary Officer of nmmc and his family died in accident on mumbai pune expressway | कोरोनाविरुद्ध जिंकले, पण नियतीसमोर हरले; कोरोना योद्ध्याचा कुटुंबासह अपघाती मृत्यू

कोरोनाविरुद्ध जिंकले, पण नियतीसमोर हरले; कोरोना योद्ध्याचा कुटुंबासह अपघाती मृत्यू

googlenewsNext

खोपोली (प्रतिनिधी): मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर किलोमीटर ३६ जवळ हॉटेल फूड मॉल समोर पुण्याहून मुंबईकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने चार ते पाच वाहनांना जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात ५ जण ठार झाले असून ५ जण जखमी झाले आहेत. (Mumbai Pune Expressway Accident)

हा अपघात मध्यरात्री १२.४५ च्या सुमारास घडला. क्रेटा, इनोव्हा, ट्रेलर, ट्रक अशा पाच वाहनांचा हा अपघात  झाला आहे. चार मृतदेह खोपोली नगरपरिषदेच्या रुग्णालयात आणण्यात आले आहेत. तर एका जखमीचा रुग्णालयात मृत्यू झाला.

या अपघातात नवी मुंबई महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी वैभव झुंजारे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांचा मृत्यू झाला आहे. वैभव झुंजारे हे त्यांच्या खासगी कारने ते नवी मुंबईच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला. यात त्यांची आई, पत्नी व मुलीचा मृत्यू झाला आहे.

झुंजारे हे सोलापूर येथील गावी कुटुंबाला घेऊन येण्यासाठी गेले होते. कोरोना काळात त्यांच्यावर कोरोना नियंत्रणाची जबाबदारी असल्याने खबरदारी म्हणून त्यांनी आई, वडील, पत्नी व मुलांना गावी ठेवले होते. आता कोरोना संकटाची तीव्रता कमी झाल्यानं ते कुटुंबाला घेऊन घरी येत होते. मात्र काळानं त्यांच्यावर घाला घातला.
 
अपघातातील मृतांची नावे...
१) श्रीमती मंजू प्रकाश नाहर, वय ५८, रा. इंद्रपुरी, ६०२, जवाहर नगर, एस.व्ही.रोड, गोरेगाव पश्चिम,
२) डॉ. वैभव वसंत झुंझारे, वय ४१, रा. ए/१-३,४, अधिकारी वसाहत, न.मु.महानगरपालिका, सेक्टर १५, नेरुळ, नवी मुंबई,
३) सौ. उषा वसंत झुंझारे, वय ६३, रा. ए/१-३,४, अधिकारी वसाहत, न.मु.महानगरपालिका, सेक्टर १५, नेरुळ, नवी मुंबई,
४) सौ. वैशाली वैभव झुंझारे, वय ३८, रा. ए/१-३,४, अधिकारी वसाहत, न.मु.महानगरपालिका, सेक्टर १५, नेरुळ, नवी मुंबई,
५) कु.श्रिया वैभव झुंझारे, वय-५, रा.ए/१-३,४, अधिकारी वसाहत, न.मु.महानगरपालिका, सेक्टर १५, नेरुळ, नवी मुंबई,
यांचा समावेश आहे.

या अपघातात जखमी झालेल्यांची नावे
१) स्वप्नील सोनाजी कांबळे, ३० वर्षे, रा. फ्लॅट नं. २०१, इंद्रपुरी, जवाहर नगर, एस.व्ही.रोड, गोरेगाव (पश्चिम) (जखमी)
२) प्रकाश हेमराज नाहर, वय-६५, रा. इंद्रपुरी, ६०२, जवाहर नगर, एस.व्ही.रोड, गोरेगाव पश्चिम, (जखमी)
३) कु.अर्णव वैभव झुंझारे, वय-११, रा.ए/१-३,४, अधिकारी वसाहत, न.मु.महानगरपालिका, सेक्टर १५, नेरुळ, नवी मुंबई, (जखमी)
४) किशन चौधरी, (गंभीर जखमी)
५) काळूराम जमनाजी जाट (गंभीर जखमी)
 

Web Title: Veterinary Officer of nmmc and his family died in accident on mumbai pune expressway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात