शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
2
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
3
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
4
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
6
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
7
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
8
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
9
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
10
लोकलच्या फुटबोर्डावर उभे राहणे निष्काळजीपणा नव्हे, तर..; कोर्टानेच कान टोचले... आतातरी शहाणे व्हा!
11
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
12
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
13
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
14
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
15
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
16
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
17
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
18
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
19
कढीपत्ता फोडणीतच; बायका, मुलं, भाऊ मैदानात..! कार्यकर्त्यांची सतरंज्या उचलण्याची भूमिका कधी संपणार?
20
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

“आता फक्त न्यायाची अपेक्षा”; वैभवी देशमुख रायगडावर, छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 11:02 IST

Santosh Deshmukh Daughter Vaibhavi Deshmukh News: इथे आम्हाला लढण्याची शक्ती मिळणार आहे. महाराष्ट्राने आम्हाला साथ दिली, आता फक्त न्यायाची अपेक्षा आहे, अशा भावना देशमुख कुटुंबाने रायगडावर पोहोचल्यावर व्यक्त केल्या.

Santosh Deshmukh Daughter Vaibhavi Deshmukh News: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण राज्यभरात अद्यापही चर्चेत आहे. यासंदर्भात आता पुढील न्यायालयीन लढाई सुरू आहे. संतोष देशमुख यांची हत्या किती निर्घृण पद्धतीने करण्यात आली, याची माहिती समोर येताच राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांना पदावरून पायउतार व्हावे लागले होते. संतोष देशमुख प्रकरणावरून आजही आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. यातच आता न्याय मिळावा, यासाठी देशमुख कुटुंब लढा देत आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख, बंधू धनंजय देशमुख रायगडावर गेले आहेत. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मावळ्यांवर जेव्हा अन्याय झाला, तेव्हा शिवाजी महाराजांनी त्यांना न्याय मिळवून दिला. तसेच ज्यांनी असे अन्याय करणारे कृत्य केले, त्यांना कठोर शिक्षा दिली. आजही महाराष्ट्रात माझ्या वडिलांची हत्या झाली, तशी अनेकांची हत्या झालेली आहे. या सरकारकडून मला हीच अपेक्षा आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील जशी शिक्षा देण्याची प्रथा होती तीच प्रथा गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी वापरली तर राज्यातील गुन्हे थांबतील, असे वैभवी देशमुख यांनी म्हटले आहे. 

महाराष्ट्राने आम्हाला साथ दिली, आता फक्त न्यायाची अपेक्षा

गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना  साकडे घालणार आहे. महाराष्ट्राने आम्हाला साथ दिली, आता फक्त न्यायाची अपेक्षा आहे, असे वैभवी देशमुख यांनी सांगितले. प्रशासनाकडून आम्हाला अपेक्षा आहे की, त्यांनी आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा. शिवराज्याभिषेक सोहळा होत आहे. आम्ही संकल्प करणार आहोत. इथे आम्हाला लढण्याची शक्ती मिळणार आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी संघर्ष केला. ज्या मावळ्यांना, ज्या प्रजेला न्याय द्यायचे काम त्यांनी केले. तसेच या शासनाने केले पाहिजे. महाराष्ट्रात एक उदाहरण घालून द्यायला हवे की, इथे गुन्हेगारीला कुणीही साथ देणार नाही. गुन्हेगारी कायमची कशी संपवली जाईल. याकडे लक्ष दिले पाहिजे. आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी बंधू धनंजय देशमुख यांनी केली.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा आज किल्ले रायगड वर पार पडतोय. या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी आज राज्यातील तीन ते चार लाख शिवभक्त गडावर दाखल झालेत. छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते हा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. याचा उत्साह गडावर पाहायला मिळतोय.

 

टॅग्स :Shivrajyabhishekशिवराज्याभिषेकRaigadरायगडSantosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरणbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्या