वडखळ-अलिबाग १२ मिनिटांत
By Admin | Updated: October 28, 2016 03:52 IST2016-10-28T03:52:03+5:302016-10-28T03:52:03+5:30
गेल्या अनेक वर्षांपासून प्रस्तावित १७०० कोटी रुपये अंदाजित खर्चाच्या ‘अलिबाग ते वडखळ’ या चौपदरी महामार्ग प्रकल्पाला गती आली असून याची निविदा प्रक्रि या डिसेंबर २०१६ मध्ये

वडखळ-अलिबाग १२ मिनिटांत
- जयंत धुळप, अलिबाग
गेल्या अनेक वर्षांपासून प्रस्तावित १७०० कोटी रुपये अंदाजित खर्चाच्या ‘अलिबाग ते वडखळ’ या चौपदरी महामार्ग प्रकल्पाला गती आली असून याची निविदा प्रक्रि या डिसेंबर २०१६ मध्ये सुरू होणार आहे. या महामार्गाच्या पूर्णत्वाअंती गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वडखळ ते अलिबाग हे अंतर केवळ १२ मिनिटांत कापता येणार आहे. त्यातून वेळेची मोठी बचत होणार असल्याची माहिती विधान परिषद सदस्य आमदार जयंत पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.
‘अलिबाग ते वडखळ’ या चौपदरी महामार्ग प्रकल्पाला गती देण्याच्या हेतूने आ.जयंत पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे विशेष बैठक आयोजित करण्याची मागणी केली होती. त्यानुसार गडकरी यांनी बुधवारी दिल्लीत या बैठकीचे आयोजन केले होते. आ. पाटील यांनी मांडलेल्या विविध मुद्यांवर विचार विनिमय होवून महत्त्वाचे निर्णय या बैठकीत गडकरी यांनी घेतले. येत्या ७ नोव्हेंबर रोजी पुन्हा एक आढावा बैठक याच संदर्भात बोलावण्यात आली असून त्यानंतर खऱ्या अर्थाने या कामास वेग येईल, अशी अपेक्षा आ.पाटील यांनी व्यक्त केली आहे.
२५ नोव्हेंबरपर्यंत महामार्गाकरिता आवश्यक डी.पी.आर.ची प्रक्रि या पूर्ण केली जाईल. त्यानुसार अंदाजे खर्च संकलित केला जाणार आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात निविदा प्रक्रि या सुरू केली जाईल. त्याचबरोबर यासाठी जमीन ताब्यात घेण्याच्या प्रक्रि येला प्रारंभ केला जाणार आहे. विविध कामांसाठी जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रि या एकत्रितपणे केल्याने या कामी वेळेची बचत होईल,असेही आ.पाटील यांनी स्पष्ट केले. निविदा जाहीर होईपर्यंत जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रि या पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर नवीन वर्षात या महामार्गाच्या प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होईल. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी हा महामार्ग लवकर व्हावा यासाठी कंबर कसली असल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीस भूपृष्ठ वाहतूक विभागाचे केंद्रीय सचिव, भूपृष्ठ वाहतूक विभागाचे वित्तीय प्रमुख व संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आ.जयंत पाटील यांनी हे काम जानेवारीपासून सुरू करण्याची आग्रही मागणी या बैठकीत केली आहे.