शुक्रवारअखेर ५ लाख बालकांचे लसीकरण पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 23:15 IST2018-12-29T23:15:27+5:302018-12-29T23:15:39+5:30
गोवर, रु बेला लसीकरण अभियानात रायगड जिल्ह्यात शुक्रवारअखेर जिल्ह्यातील पाच लाख ४१ हजार ३३६ बालकांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी दिली आहे.

शुक्रवारअखेर ५ लाख बालकांचे लसीकरण पूर्ण
अलिबाग : गोवर, रु बेला लसीकरण अभियानात रायगड जिल्ह्यात शुक्रवारअखेर जिल्ह्यातील पाच लाख ४१ हजार ३३६ बालकांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी दिली आहे.
जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत प्राप्त अहवाल जिल्ह्यातील ११७ शाळांमध्ये लसीकरण राबविले. यात १७ शाळांमध्ये जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अखत्यारीतील यंत्रणेमार्फत ११८९ विद्यार्थ्यांना तर ३८ शाळांमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अखत्यारीतील यंत्रणेमार्फत सहा हजार ३८९ विद्यार्थ्यांना अशा एकूण सात हजार ५७८ विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. त्यात चार हजार ४५ मुले व तीन हजार ५३३ मुलींचा समावेश आहे, तर मोहीम सुरू झाल्यापासून आजअखेर एकूण दोन लाख ८१ हजार ३३ मुले व दोन लाख ६० हजार ३०३ मुली असे एकूण पाच लाख ४१ हजार ३३६ विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. या अभियानांतर्गत जिल्हा आरोग्य यंत्रणा आतापर्यंत ५३०१ शाळांपर्यंत पोहोचली आहे.