मुदत तपासूनच वापरा गॅस सिलिंडर

By Admin | Updated: December 9, 2015 00:56 IST2015-12-09T00:56:54+5:302015-12-09T00:56:54+5:30

घरगुती गॅस सिलिंडर वापराबाबत अद्यापही ग्राहकांमध्ये जागरूकता दिसून येत नाही. अनेकांना गॅस गळतीबरोबरच सिलिंडरलाही ठरावीक मुदत देण्यात आलेली असते

Use Gas Cylinders to Check Fixed | मुदत तपासूनच वापरा गॅस सिलिंडर

मुदत तपासूनच वापरा गॅस सिलिंडर

पनवेल : घरगुती गॅस सिलिंडर वापराबाबत अद्यापही ग्राहकांमध्ये जागरूकता दिसून येत नाही. अनेकांना गॅस गळतीबरोबरच सिलिंडरलाही ठरावीक मुदत देण्यात आलेली असते, याबाबत माहितीच नसते. मुदत संपलेला सिलिंडर घरात जिवंत बॉम्ब असल्यासारखेच आहे. त्यामुळे सिलिंडर घेताना जागरुक राहण्याचे आवाहन शिवसेना ग्राहक कक्षाचे किरण तावदारे यांनी केली आहे.
सिलिंडरच्या मुदतीचा विषय अद्याप चर्चेत आला नसला तरी, व्हॉट्सअ‍ॅपवरून या संबंधीची माहिती होत आहे. वितरकांकडून गॅसबचत, गळतीविषयी जागृती केली जाते. सिलिंडरच्या मुदतीबाबत अनेकांना ज्ञात नसते. त्यामुळे ग्राहकांनी गॅस वितरकांशी बोलून खात्री करणे आवश्यक आहे. गॅस वापराबाबत जागरूकता निर्माण न झाल्याने अपघाताच्या घटनाही घडल्याचे तावदारे यांनी सांगितले.
कांदिवलीत झालेल्या सिलिंडर स्फोटाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाने जनजागृती सुरु केली आहे. जागृत असणे आवश्यक असल्याचे गॅस वितरकांचे म्हणणे आहे.

Web Title: Use Gas Cylinders to Check Fixed